शहरं
Join us  
Trending Stories
1
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
2
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
3
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
4
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
5
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
6
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
7
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
8
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
9
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
10
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
11
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
12
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
13
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
14
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
15
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
16
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
17
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

विकासाच्या योजना धनदांडग्यांनीच लाटल्या

By admin | Updated: February 11, 2016 02:57 IST

जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अनेक योजना राबविल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचीच निवड केली जाते.

पंचायत समिती : सेस फंडातील योजनांसाठी लाभार्थी निवडताना पदाधिकाऱ्यांचा दबाव मोहदी : जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून अनेक योजना राबविल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजनासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचीच निवड केली जाते. महागाव पंचायत समितीत मात्र कृषी विभागाच्या बहुतांश योजनांचा लाभ धनदांडग्यांनीच घेतला आहे. त्यामुळे सेस फंडाच्या योजनेतून खरे लाभार्थी डावलण्यात आले आहे.पंचायत समिती कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना सेस फंडातून खरेदी केलेल्या विविध वस्तूचा लाभ दिला जातो. कृषी उपयोगी हे साहित्य वितरीत करण्यासाठी निकष ठरविण्यात आले आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या व्यक्तीलाच शेती उपयोगी बैलगाडी, ताडपत्री, नागर, विजेचे पंप, टिनपत्रे, शिलाई मशीन यासारखे अनेक साहित्य सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात. सिंचनासाठी एचडीपी, पीव्हीसी पाईपही १०० टक्के अनुदानावर दिला जातो. या योजनांचे लाभार्थी निश्चित करूनच वाटप केले जाते. त्या उपरही लाभार्थी निवडताना महागाव पंचायत समितीने खऱ्या शेतकऱ्यांना डावलून पदाधिकाऱ्यांच्या दबावात धनदांडग्या शेतकऱ्यांनाच हे साहित्य दिले आहे. अनेक लाभार्थी शेतकरी योजनेच्या निकषास पात्र नसल्याने गावातील गरीब शेतकऱ्यांच्या नावे या योजनेचा लाभ परस्पर घेतला आहे. याची कल्पनाही खऱ्या लाभार्थी शेतकऱ्याला नाही. बऱ्याचदा स्थानिक अधिकारी आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांना हे साहित्य देवून त्याची विल्हेवाट लावतात. लाखो रुपयाचे हे साहित्य गरज शेतकऱ्यासाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाते. शेतकरी हिताची ही योजना राजकीय दृष्टिकोनातून सोयीच्या पद्धतीने राबविली जात असल्याने गरजू लाभार्थी या पासून वंचित राहतात. जिल्हा परिषदेने कृषी साहित्याची खरेदी करण्यापूर्वीच लाभार्थी यादी निश्चित करून घेणे आवश्यक आहे. बरेचदा पंचायत समितीस्तरावरून अशा स्वरूपाच्या याद्याच उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यामुळे सेस फंडातील रक्कम आर्थिक वर्षात खर्च करणे शक्य होत नाही. (वार्ताहर)