शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विकासासाठी भासते निधीची चणचण

By admin | Updated: August 27, 2014 23:53 IST

शहराच्या विकास कामांसाठी निधीची चणचण भासत आहे. विकासाला मोठ्या निधीची गरज आहे़ निधी देण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.

वणी : शहराच्या विकास कामांसाठी निधीची चणचण भासत आहे. विकासाला मोठ्या निधीची गरज आहे़ निधी देण्यासाठी पालकमंत्र्यांना साकडे घालण्यात आले आहे.वणी शहरात रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, प्रकाश योजना, या सर्वच विभागात प्रचंड अनुशेष निर्माण झाला आहे़ शहरातील एकही रस्ता धड नाही. जागोजागी खड्डे पडलेले आहेत. पाणी पुरवठ्याही विविध अडवणी आहेत. नाल्यांची कमतरता आहे. रस्त्यांच्या सुधारणेची गरज आहे. त्यासाठी नगरपरिषदेला निधीची प्रचंड चणचण जावणत आहे. निधीअभावी शहराच्या विकासाला खीळ बसली आहे.सध्या तेराव्या वित्त आयोगातून पाईप ड्रेनची तीन कोटी रूपयांची कामे नगरपरिषदेतर्फे सुरू आहेत़ नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत विविध प्रभागात दोन कोटींची विविध कामे मंजूर झाली आहेत़ शहरातील प्रगतीनगरमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम आता सुरू झाले आहे़ जलनिस्सारण पाण्याच्या टाकीला ४४ लाख रूपयांची संरक्षक भिंत बांधली जात आहे़ नगर उत्थात निधी अंतर्गत ४५ कोटींचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आले आहे़ यात प्रत्येक प्रभागात विविध विकास कामांचा समावेश आहे. यामध्ये सर्वच नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात सुचविलेल्या विविध कामांचा समोवश आहे. नागरी दलित वस्ती सुधार निधीतून विकास कामे राबविण्यासाठी तब्बल पाच कोटींची गरज आहे. नगर उत्थान निधीतून शहरात चार कोटींचे विकास कामे करावयाची आहेत. तसेच वैशिष्टपूर्ण निधीतून भरीव निधीची नगरपरिषदेला गरज आहे. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती निधीतून पाच कोटी रूपये शहराच्या विकासासाठी आवश्यक आहे. शहरातील मटन मार्केट निर्मितीसाठी एक कोटी रूपयांचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. एवढा निधी मिळाल्यास शहरातील विकास कामांना चालना मिळणार आहे. त्यातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे हा निधी तातडीने नगरपरिषदेला उपलब्ध करून द्यावा, असे साकडे पालकमंत्र्यांना घालण्यात आले आहे. त्यासाठी बांधकाम सभापती धनराज भोंगळे यांच्या नेतृत्वात उपाध्यक्ष अशोक बुरडकर, नगरसेवक पीक़े़ टोंगे, विनोद निमकर यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)