शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

डिटोनेटर्स अप्रशिक्षित मजुरांच्या हाती

By admin | Updated: May 13, 2015 02:19 IST

विहिरी खोदण्यासह स्टोन क्रशर आणि खदानींमध्ये वापरण्यात येणारे डिटोनेटर्स अप्रशिक्षित माणसांच्या हाती असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.

उमरखेड : विहिरी खोदण्यासह स्टोन क्रशर आणि खदानींमध्ये वापरण्यात येणारे डिटोनेटर्स अप्रशिक्षित माणसांच्या हाती असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सध्या उमरखेड तालुक्यात परप्रांंतीय ट्रॅक्टरसह दाखल झाले असून विना परवाना व्यवसाय करताना दिसत आहे. त्यातच एका परवान्यावर अनेकजण व्यवसाय करताना दिसत आहे. डिटोनेटर्सच्या वापरासाठी कडक बंधन असतानाही त्याचा खुलेआम उपयोग केला जात आहे. शेतातील विहिरी खोदणाऱ्यांच्याच नावावर रेकॉर्ड लिहिले जाते. विशेष म्हणजे केवळ एकच परवानाधारक व्यावसायिकाच्या नावावर १५ ते २० ड्रिलिंग करणारे ट्रॅक्टर दिसत आहेत. या व्यवसायात परप्रांतीय आणि त्यातही राजस्थानातील नागरिकांचा समावेश आहे. गावात अथवा शेतात विहीर खोलीकरणासाठी स्फोटकांचा वापर केला जातो. प्रत्यक्षात या कामावर ट्रॅक्टरवरील निरक्षण मजूर स्फोटके उडविताना दिसून येतात. सुुरक्षेची कोणतीही साधने न वापरता ही स्फोटके हाताळल्या जातात. उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात आणि शहरातही असा प्रकार दिसत आहे. स्फोटके सुरक्षितरीत्या ठेवावी लागतात. तसेच ही स्फोटके वस्तीबाहेर सुरक्षितस्थळी ठेवण्याचा नियम आहे. मात्र उमरखेड तालुक्यातील अनेक गावांत भरवस्तीत स्फोटके ठेवली आहे. असामाजिक तत्त्वांच्या हाती ही स्फोटके लागली तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उमरखेड तालुक्यातील अभयारण्य परिसरात डिटोनेटर्सचा वापर करण्यावर बंदी आहे. मात्र या भागातही परप्रांतीयांचे ट्रॅक्टर दिसून येतात. स्फोटके घेऊन फिरणाऱ्या या ट्रॅक्टरमुळे उन्हाळ्याच्या दिवसात भीषण अपघाताची शक्यता असते. मात्र कुणीही या ट्रॅक्टर चालकांना अटकाव करताना तालुक्यात दिसत नाही. (शहर प्रतिनिधी)