शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा

By admin | Updated: July 5, 2015 02:28 IST

जनतेचे आपण नोकर आहोत, जनतेच्या तक्रारी असेल तर त्याचे त्वरित निराकरण करणे आपले काम आहे.

संचिद्र प्रताप सिंह : उमरखेड येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठकउमरखेड : जनतेचे आपण नोकर आहोत, जनतेच्या तक्रारी असेल तर त्याचे त्वरित निराकरण करणे आपले काम आहे. शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करा. या कामात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी सचिंंद्र प्रताप सिंह यांनी आढावा बैठकीत आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बजावले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी उमरखेडमध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या. प्रत्ये विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश दिले. प्रत्येकाशी सलोख्याने व सामंजस्याने वागण्याचा सल्लाही दिला. जनतेच्या कामात कुणीही कुचराई करू नये. प्रत्येकाने आपले काम पारदर्शक करावे असे सांगितले. कोणावरही कारवाई करण्याची माझी इच्छा नाही, त्यामुळे त्यांनी जनतेची कामे प्रामाणिकपणे करा आणि मला कारवाई करण्यास भाग पाडू नका असे त्यांनी उपस्थितांना सांगितले. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी भाकरे, महाजन, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार सचिन शेजाळ, महागावचे तहसीलदार काळे, मुख्याधिकारी प्रवीण मानकर आदी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांच्या समस्यांची निवेदनेही स्वीकारली. (शहर प्रतिनिधी)