शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

संत्रा बागायतदार उद्ध्वस्त

By admin | Updated: August 27, 2014 23:53 IST

आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यावर्षी शेती पिकणार की, नाही अशी विदारक परिस्थिती आहे. अशातच संत्राही हातचा गेल्यात जमा आहे. संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात गळाला आहे.

कळंब : आधीच अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. यावर्षी शेती पिकणार की, नाही अशी विदारक परिस्थिती आहे. अशातच संत्राही हातचा गेल्यात जमा आहे. संत्र्याचा आंबिया बहार मोठ्या प्रमाणात गळाला आहे. हातात येणारे संत्रा पीक उद्ध्वस्त होतानाचे चित्र पाहावे लागण्याची दुर्देवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तालुक्यात भाजीपाल्यासह फळवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. अनेक शेतकऱ्यांकडे संत्रा बागा आहे. परंतु यावेळेस आंबिया बहार डोळ्यादेखत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. फळांची गळती इतकी मोठी आहे की, अर्ध्यापेक्षा अधिक संत्रा पडलेला आहे. संत्र्याने लदबदलेली झाडे बोडखी झाली आहे. याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. फळगळती थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक प्रकारची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. परंतु पदरी निराशाच पडली. याचा फटका तालुक्यातील १२० पैकी ८० हेक्टरातील संत्राबागांना बसला. पर्यायाने २३ हजार झाडे क्षतिग्रस्त झाली. त्यामुळे संत्रा बागाच्या नुकसानीचा सर्वे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी चंद्रशेखर चांदोरे, विजय वाके, विनोद पद्माकर काळे, अविनाश मेत्रे, माणिक वाके, रफीक शेख, संजय रावेकर, श्याम केवटे, श्याम बांते, मुरलीधर डेहनकर, सुनील बरडे, भास्कर महाजन, तुषार मेत्रे, डॉ.मोहन तुंडलवार, विलास खसाळे, मोहन उमरतकर, विशाल अजमिरे, पुनमचंद छल्लानी, त्र्यंबक वाके, काशिनाथ काळे आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)