शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नगर पालिकेला 44 कोटींचा निधी मिळूनही विकासकामे रेंगाळलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे  करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते. 

नरेश मानकरलोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : नगरपरिषदेत नगराध्यक्षासह १९ पैकी १४ सदस्य निवडून देऊन पांढरकवडावासीयांनी प्रहार जनशक्ती पार्टीवर विश्वास दाखवित एकहाती सत्ता दिली.  पालिकेला विकास कामासाठी मागील चार वर्षात ४४ कोटी ६७ लाखांचा घसघशीत निधीही मिळाला. परंतु  नियोजनाचा अभाव असल्याने अनेक कामांना मुहूर्तच मिळाला नाही. दुसरीकडे मंजूर असलेली अनेक कामेही रखडलेली असल्याने शहरवासीयांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून येते. शहरात योग्य नियोजनाअभावी  कामांवर खर्च करूनही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात सत्ताधारी कमी पडल्याच्या नागरिकांच्या भावना आहेत. त्यामुळेच नागरिकांना विविध समस्यांचा आजही सामना करावा लागत आहे.  शासनाच्या  विविध योजनांअंतर्गत विकास कामांसाठी मिळालेल्या निधीतून विकास कामे  करण्यात आली. परंतु कामाचे नियोजन आवश्यक असताना, मूलभूत सोयी-सुविधांऐवजी इतर कामांना प्राधान्य दिले असल्याचे दिसते. 

अतिक्रमणांची समस्या कायम  शहरातील मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार परिसर, डीपी रोड,  बसवेश्वर चौक ते डायमंड चौक, शिबला पॉईंट्सह अनेक ठिकाणी अतिक्रमणांची समस्या कायम आहे. शहरातील रस्ते मोठे असूनही  व्यापाऱ्यांनी रस्त्यावरच अतिक्रमण केल्यामुळे रस्ते अरुंद बनले आहेत.

रस्त्यांची दयनीय अवस्थापावसामुळे  रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा रस्ता असलेल्या वाय पॉईंट ते  बसवेश्वर चौकादरम्यान, बिरसा मुंडा चौक ते  स्टेट बँक रोड, तसेच वसंतराव नाईक चौक ते विश्रामगृह रोड ते बिर्सा मुंडा चौकदरम्यान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा होत आहे.

नवीन वसाहतीत घाणीचे साम्राज्यशहरात नवीन झालेल्या काही वसाहतींमध्ये नाल्यांची कामे न झाल्यामुळे सांडपाणी मोकळ्या जागेत व रस्त्यावर येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. नीलकंठनगरमध्ये नाल्यांचे बांधकाम न केल्याने सांडपाणी मोकळ्या जागेत जमा होत आहे. त्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. 

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी

पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ च्या जुन्या पुलावरून जाणाऱ्या रस्त्यावरही घाणीचे साम्राज्य पसरले आहे. येथे पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत घ्यावा लागतो. 

वारंवार वाहतूक होते ठप्प

शहराच्या मुख्य रस्त्यावर दुतर्फा भाजीपाला, फळ विक्रेते व मिठाईवाल्यांची दुकाने लागतात. त्यातच गुरांचा ठिय्याही रस्त्यावरच असतो. त्यामुळे वाहतूक वारंवार ठप्प होते. यामुळे पांढरकवडावासीय त्रस्त झाले आहेत. 

ही महत्त्वाची कामे आहेत अर्धवट स्थितीतशहराला खुनी नदीच्या पाण्याद्वारे पाणीपुरवठा होतो.  या योजनेची पाईपलाईन बदलणे आवश्यक असताना, हे काम रखडले आहे. हिंदू स्मशानभूमीवरील मोठ्या शेडचे बांधकामही सत्ताधाऱ्यांच्या  कार्यकाळात  रखडलेलेच आहे. महादेव घाट सौंदर्यीकरणाचे कामही जैसे थे आहे. 

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण