शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३०० कोटींच्या खर्चानंतरही विकास शून्य

By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST

जिल्ह्याच्या विकासावर गत पाच वर्षांत विविध विकास कामांवर १३०० कोटी रूपये खर्ची घातले. मात्र जिल्ह्यातील समस्या आजही जैसे थेच आहे. त्यामुळे नियोजनाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे.

यवतमाळ : जिल्ह्याच्या विकासावर गत पाच वर्षांत विविध विकास कामांवर १३०० कोटी रूपये खर्ची घातले. मात्र जिल्ह्यातील समस्या आजही जैसे थेच आहे. त्यामुळे नियोजनाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. गावाकडचे रस्ते उखडले आहेत. तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम आहे. पर्यटनाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करून विकासकामांना दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. जिल्हा नियोजन समिती याबाबत निर्णय घेते. यातून कृषी व सलग्न सेवा, ग्रामीण विकास, सामाजिक व सामुहिक सेवा, जलसंधारण व जलसंपदा, उर्जा विकास, उद्योग व खानकाम, परिवहन, सामान्यसेवा, सामान्य आर्थिक सेवा, लघु पाटबंधारे व पूरनियंत्रण, वाहतूक आणि दळणवळण या प्रमुख बाबींवर हा निधी खर्च करण्यात आला. यानंतरही या सर्वच क्षेत्रात समस्या कायम आहेत. प्रामुख्याने वाहतुकीच्या मार्गावर जागोजागी खड्डे आहेत. ऊर्जा विकासाची कामे खोळंबली आहेत. डीपीअभावी अनेक भागात वीज पुरवठा खंडित होतो. तर कृषीपंपाचे हजारो वीज जोडणी निधी अभावी खोळंबली आहे. अनेक भागात पाण्याच्या टाक्या झाल्या. मात्र काही ठिकाणी निकृष्ट कामाच्या तक्रारी आहेत. तर काही ठिकाणी थोडा निधी कमी पडल्याने पाणी पुरवठा थांबला आहे. सिंचनासाठी असलेले कालवे जागोजागी नादुरुस्त आहेत. दुरूस्ती अभावी शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचले नाही. पर्यटनस्थळ म्हणून काही ठिकाणे जाहीर झाले. मात्र त्याला मिळणारा निधी आणि काम करण्याची गती मंद आहे. यातून या स्थळांचा विकास खोळंबला आहे. सिंचनाच्या सोयी वाढाव्या ओलीताचे क्षेत्र दुप्पट व्हावे म्हणून सुक्ष्म सिंचन आणि स्प्रिंकलवर अनुदान जाहीर झाले. मात्र सुक्ष्म सिंचनाच्या निधी अभावी आजही शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. आदीवासी बांधवाच्या प्रगतीसाठी शासनाने निधी आरक्षित केला. त्यातून विविध विकास कामे हाती घेण्यात आले. मात्र आदिवासी विकास विभागाने हा निधी दरवर्षी खर्च करण्यात आखडता हात घेतला. परिणामी निधी परत जावून दुसऱ्यावर्षी अनुदानात मर्ज झाला. मात्र लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळणे अवघड झाले. लोकप्रतिनिधीची उदासिनता आणि काम करणाऱ्या यंत्रणेचे दुर्लक्ष यातून विकास कामे प्रभावित झाली. पाच वर्षात १३०० कोटी रूपयांचा निधी वित्त विभागाकडून वळता झाला. मात्र त्यातून ठोस उपाय झाले नाही. त्यामुळे आजही जिल्हा विकासापासून कोसो दूर आहे. (शहर वार्ताहर)