शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आपसी बदल्यांमध्ये आरटीई समायोजनाचा खोडा

By admin | Updated: November 1, 2014 01:18 IST

दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे.

यवतमाळ : दिवाळीच्या सुटीत शिक्षकांच्या आपसी बदल्या कराव्या असे पत्र ग्रामविकास विभागाने दिले आहे. मात्र यामध्ये नमूद असलेल्या अटींमुळे आपसी बदलीच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. बदलीसाठी अधिर झालेल्या शिक्षकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून जिल्हा परिषदेसमोर धरणे दिल्या जात आहे. या प्रकरणात तोडगा काढण्याचा पेच जिल्हा परिषद प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २२ आॅगस्ट २०१४ मध्ये दिलेल्या शासन आदेशानुसार २०११-१२ या वर्षात प्रशासकीय बदलीने बदलून गेलेल्या शिक्षकांच्या आपसी बदल्या करता येणार आहे. मात्र यासाठी शिक्षणहक्क कायदा २००५ मधील तरतुदीनुसार शिक्षकांचे समायोजन करणे आवश्यक आहे. या समायोजनानंतरच आपसी बदलीची प्रक्रिया करण्याचे निर्देश या आदेशातून देण्यात आले आहे. ही अट घातल्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. आपसी बदल्याबाबत स्पष्ट निर्देश असले तरी ती प्रक्रिया करण्यासाठी अट घालण्यात आली आहे. दिवाळीच्या सुट्या संपत असून केवळ दोन दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. यामध्ये शिक्षण हक्क कायदा २००५ नुसार शिक्षकांचे समायोजन करणे शक्य नाही आणि या समायोजनापूर्वी आपसी बदल्या करता येणार नाही, अशी अटच शासन आदेशात आहे. हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्न शिक्षण विभागापुढे निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शिक्षण विभाग सातत्याने आपसी बदल्यांसाठी टाळाटाळ करीत असल्याचे आरोप शिक्षक संघटनेकडून केले जात आहे. आपसी बदल्यांसाठी शिक्षक संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन या प्रकरणात तोडगा काढू शकणार नाही ही बाब लक्षात आल्याने शिक्षकांनी आयुक्तांपुढे दाद मागण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. नेमका या प्रकरणात कोणता निर्णय होतो, याकडे बदली पात्र असलेल्या शिक्षकांचे लक्ष लागले आहे. शासकीय अटींच्या गुंत्यात ही बदली प्रक्रिया अडकली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढला जावा असे निर्देशही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)