शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

ठेवीदार ‘भगवंत’ भरोसे

By admin | Updated: August 7, 2015 02:19 IST

येथील भगवंत पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. परंतु नेमके दोषी कोण आहे, हे अजूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निश्चित करता आले नाही.

संचालकांमध्ये दोन गट : भगवंत पतसंस्थेचा घोटाळाहरिओम बघेल आर्णीयेथील भगवंत पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला. परंतु नेमके दोषी कोण आहे, हे अजूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निश्चित करता आले नाही. बँकेत किंवा संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आॅडिट सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जाते. हे आॅडिट येत्या १० आॅगस्टला संपणार आहे. त्यानंतरच दोषी कोण, हे समोर येईल असे सहायक निबंधक एम.आर. अंबिलपुरे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी ठेवीदारांना कुणीही वाली उरलेला नाही.या पतसंस्थेत ८० ते ८५ ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. त्या ठेवी दोन कोटी रुपयांच्या घरात आहेत. ठेवीदारांची मुदत संपून तीन ते चार वर्षे उलटली. परंतु ठेवी परत मिळाल्या नाहीत. त्यामुळे बँकेचे संचालक व कर्मचारी हेच खऱ्या अर्थाने दोषी आहेत. त्यांची संपत्ती सील करून ठेवीदारांची रक्कम व्याजासह परत देण्यात यावी, यासाठी ठेवीदार वारंवार वरिष्ठांकडे चकरा मारत आहेत. मात्र कुठेही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ठेवीदारांनी आता २० जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून संचालक व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संचालक व बँक कर्मचाऱ्यांनी मिळून नियम डावलून कसा घोटाळा केला, याविषयी निवेदनात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या निवेदनावर राजाभाऊ कोडाप्पा पद्मावार, रामदास येरावार यांच्यासह अनेक ठेवीदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.भगवंत बिगर शेती सहकारी पतसंस्था यामध्ये १३ संचालक आहेत. बँकेत कारभार व्यवस्थित सुरू नाही, नियमांना तिलांजली देवून स्वार्थ साधला जात असल्याचे काही संचालकांच्या लक्षात आले होते. त्यावेळी त्यांनी जबाबदार संचालकांना सावधानही केले होते. परंतु पदाधिकारी संचालक गांभीर्याने घेत नसल्याचे लक्षात आल्यावर यातील काही संचालकांनी आपल्यावर आरोप येवू नये, म्हणून राजीनामेही दिले होते. या घटनेमुळे संचालक मंडळात सरळ-सरळ दोन गट पडले आहेत. यातील काही संचालक निरपराध आहेत, असे ठेवीदारसुद्धा सांगत आहे. दोषी कोण आहे हे १० आॅगस्टनंतर सिद्ध होणार आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याची नियुक्ती रद्द करापतसंस्थेत घोळ झाला म्हणून पुढील कामकाज पाहण्यासाठी संबंधित विभागाने प्राधिकृत अधिकारी म्हणून अनंता उत्तमराव नागरगोजे यांची नियुक्ती केली. परंतु या अधिकाऱ्यावर महागाव पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. नागरगोजे यांनी महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागालाही फसविले आहे. याची माहिती तत्कालीन सहायक निबंधक बी.डी. राठोड यांना होती. कारण राठोड हे पुसद येथेही कार्यरत होते. असे असताना बी.डी. राठोड यांनी नागरगोजे यांची प्राधिकृत अधिकारी पदावर केलेली नियुक्ती चुकीची आहे. ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी बँकेचे सभासद सुहास येरावार, तुकाराम काळे, रमेश काळे, भास्कर ढबाले, महादेव टांगले यांनी सहकारमंत्र्यांसह जिल्हा उपनिबंधकांकडे केली आहे.