यवतमाळ : ढुमणापूर येथील मारोती मंदिर देवस्थानमध्ये एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा पार पडला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक सचिव अभय बिहुरे होते. एसटी बँक संचालक प्रवीण बोनगीनवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेचे संस्थापक भाऊ फाटक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अध्यक्ष संदीप शिंदे व कार्याध्यक्ष सदाशिव शिवनकर यांचा सत्कार करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना शासकीय कामगारांचा दर्जा देऊन सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. कनिष्ठ वेतनश्रेणी रद्द करून वेतनवाढीच्या आधीन राहून २५ टक्के मागणीसाठी २४ आॅक्टोबर रोजी विभागीय पातळीवर धरणे आंदोलन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवनकर यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष राहुल धार्मिक, सूत्रसंचालन प्रकाश देशकरी यांनी केले. आभार प्रादेशिक महिला संघटक रंजूषा किरणापुरे यांनी मानले. विलास डगवार, अरुण काळे, रामजी राठोड, प्रमिला गेडाम, सत्यभामा गादेकर, उषा ताथोड, रत्नमाला गायकवाड, लक्ष्मी निसरकार, दिलीप पंधरे, मोहन मुंजेकर, नितीन चव्हाण, मयूर जगताप, शैलेश जगदाळे, मे. युनुस, चंदू आत्राम, वसंत गावंडे, पंकज लांडगे, सहारे, इरफान खान, सुधाकर चव्हाण, अविनाश वानखडे, अरुण वाघमारे, दुबे, भारत पेंदोर, मनोरमा धोंगडे, माया कंगाले, इंदू यादव, नयना संगेवार, अनुराधा शेलोकार, दत्ता खारोळ, संतोष खडसे आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा
By admin | Updated: September 25, 2016 02:58 IST