शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

‘डिमोशन’ची टांगती तलवार

By admin | Updated: August 9, 2014 23:56 IST

पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या काही शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत आहे. आॅक्टोबर २०१३ पासून २५० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहे.

जिल्हा परिषद : अडीचशे मुख्याध्यापक अतिरिक्त, खर्चही व्यर्थयवतमाळ : पटसंख्येअभावी जिल्हा परिषदेच्या काही शाळांना टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अशाही स्थितीत मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत आहे. आॅक्टोबर २०१३ पासून २५० मुख्याध्यापक अतिरिक्त ठरले आहे. त्यांच्या समायोजनास विलंब झाल्याने महिन्याकाठी सव्वा कोटींच्या वेतनाचा बोझा शासनाला सहन करावा लागत आहे. अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन शक्य न झाल्यास त्यांची पदावनती करण्यात येणार आहे. अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकास जिल्हा परिषद महिन्याकाठी ४५ ते ५० हजार रुपये वेतन देते. प्रत्यक्षात कामाची कोणतीच जाबाबदारी नसल्याने हा पैसा व्यर्थ जात आहे. याबाबत तातडीने निर्णय न झाल्याने कित्येक दिवस गोंधळातच गेले. आता अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन केले आहे. त्यानंतरही आणखी ५३ मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत आहे. समायोजनासाठी त्यांची पदावनती करून सहायक शिक्षक म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. यानंतर सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या जागेवर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. तो पर्यंत मात्र, अतिरिक्त मुख्याध्यापकांना सहायक शिक्षक म्हणूनच काम करावे लागणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूूर खंडपीठाने फेब्रुवारीमध्ये सहा आठवड्यात शिक्षकांना पदोन्नती देऊन अतिरिक्त मुख्याध्यापकांच्या समायोजनाचा आदेश दिला होता. याच आदेशाच्या धास्तीने गोंधळलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही. पदोन्नती ऐवजी वेतोन्नती हा शब्दप्रयोेग करून अतिरिक्त मुख्याध्यापकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याच भूमिकेमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आता गुंता सोडविण्यासाठी थेट पदावनतीचा निर्णय प्राथमिक शिक्षण विभागाने घेतला आहे. (कार्यालय प्रतिनिधी )