शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘डीपीसी’पुढे निदर्शने आणि मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 21:54 IST

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जिल्हा कचेरीत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे औचित्य साधून निदर्शने आणि मोर्चे धडकले. पुसद जिल्हा निर्मितीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. तर आपल्या मागण्यांसाठी संग्राम केंद्र चालकांनी की-बोर्ड मोर्चा काढला. तर ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी वरुडचे नागरिक जिल्हा कचेरीवर धडकले.पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. पुसद ...

ठळक मुद्देपुसद जिल्हा निर्मिती : संग्राम केंद्र चालकांची धडक, वरूडला हवा महसुली दर्जा

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जिल्हा कचेरीत सोमवारी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे औचित्य साधून निदर्शने आणि मोर्चे धडकले. पुसद जिल्हा निर्मितीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. तर आपल्या मागण्यांसाठी संग्राम केंद्र चालकांनी की-बोर्ड मोर्चा काढला. तर ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी वरुडचे नागरिक जिल्हा कचेरीवर धडकले.पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत आहे. पुसद जिल्हा निर्मितीची मागणी वारंवार केली जाते. पुसद येथे यापूर्वी अनेकदा आंदोलन करण्यात आली. सोमवारी पुसद जिल्हा निर्मितीसह शेंबाळपिंपरी तालुक्याच्या निर्मितीसाठी पुसद तालुक्यातील शेकडो नागरिक डीपीसीपुढे धडकले. २६ जानेवारीपर्यंत पुसद जिल्हा करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी एक निवेदन पालकमंत्री मदन येरावार आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अ‍ॅड. सचिन नाईक, शेंबाळपिंपरी तालुका निर्मिती संघर्ष समितीचे उत्तम ढोले, जैनूल सिद्दीकी, अभय गडम, ज्ञानेश्वर तडसे, सतीश काकोरिया, महेंद्र मस्के, महंमद खान, भास्कर तंवर, गजानन मनवर, रेणुकादास जोशी, दिलीपराव देशमुख, रामकृष्ण पाटील, शेख आहत, बापूराव कांबळे, गुलाब वाहुळे, डी.के. कांबळे, राजेश इनकर, वसंतराव चिरमाडे, नागोराव देशमुख, राजकुमार वाहुळे, दीपक पद्मे, गुणवंतराव देशमुख, जानराव वानोळे, विलास जोगदंडे, विलास देशमुख, हनिफ पटेल, इम्रान खान, उस्मान डांगे आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील संग्राम केंद्र चालकांनी मानधनासाठी सोमवारी की-बोर्ड मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. गेल्या वर्षभरापासून मानधन न मिळाल्याने हे कर्मचारी संतप्त झाले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुणवंत राठोड, अजहर खान, मंगेश जिड्डेवार, अरुण बरडे, सचिन पवार, रवी तुमराम, अमित नाईक, राहुल पोतराजे, हरीश आदे, सुरज जयस्वाल, जयकुमार मिरासे, स्वप्नील धनरे आदी सहभागी झाले होते.गत ३० वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या प्रतीक्षेत असलेल्या यवतमाळ तालुक्यातील वरुड येथील नागरिकांनी गावाला महसुली दर्जा देण्यासाठी गावकरी सोमवारी जिल्हा कचेरीवर धडकले. यावेळी लक्ष्मण घोटेकर, स्वप्नील आत्राम, विमल आत्राम, रोहण वाडेकर, वैभव जोगदंड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.