संशयित चोरटा ताब्यातयवतमाळ : येथील शास्त्रीनगरातील संदीप राशतवार यांच्या घरी झालेल्या धाडसी चोरीप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. तसेच घटनेचे प्रात्यक्षिक त्याच्याकडून पोलिसांनी करवून घेतले. संदीप राशतवार काही कामानिमित्त सायंकाळी कुटुंबासह बाहेर गेले असता चोरट्यांनी घर फोडून सात लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी उमरसरा परिसरातील एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याला घटनास्थळी नेऊन चोरीचे प्रात्यक्षिक करवून घेतले. मात्र आरोपीजवळून मुद्देमाल हस्तगत न झाल्यामुळे पोलिसांनी अजूनही त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई केली नाही. यासोबतच रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. काल रात्रीपासून पोलीस पथक या गुन्हेगारांचा शोध घेण्यात गुंतले होते. घटनास्थळपासून श्वान पथक उमरसरा परिसरातील तीन फोटोजवळ पोहोचले होते. यावरूनच पोलिसांनी तपास चक्रे फिरविली. संशयितांना ताब्यात घेतले असून लवकरच त्यांच्याकडून घटनेची कबुली मिळेल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी दिली. (कार्यालय प्रतिनिधी)
प्रात्यक्षिक दाखविले : सात लाखांची घरफोडी
By admin | Updated: June 26, 2015 02:29 IST