शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ जिल्हा बॅंकेची निवडणूक तत्काळ घ्या; उमेदवारांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 15:22 IST

Yawatmal News Election यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले.

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क  यवतमाळ: कोरोनामुळे सुमारे दहा महिन्यांपासून लांबलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक तत्काळ घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करा यासाठी ५ उमेदवारांनी मंगळवारी सायंकाळी  जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे साकडे घातले. या निवेदनावर वसंत घुईखेडकर, शैलजा बोबडे, मनीष पाटील,  प्रफुल्ल मानकर आणि शंकरअण्णा नालमवार या पाच उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. हे निवेदन विभागीय सहनिबंधक अमरावती, सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांनाही पाठविण्यात आले आहे. 

जिल्हा बॅंक संचालक मंडळाची निवडणूक २६ मार्च २०२० ला होऊ घातली होती. परंतु निवडणुकीच्या दोन दिवस आधीच कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने ही निवडणूक थांबविण्यात आली. मात्र या निवडणुकीची आचारसंहिता आजही लागू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २०२० रोजी ही निवडणूक तातडीने घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही कोरोनाचे निमित्त करून सहकारी निवडणूक प्राधिकरण हे निवडणूक घेणे टाळत आहे. लाखो मतदार असलेल्या विधानसभा, विधान परिषदेच्या निवडणुका होत असताना अवघ्या दीड हजार मतदार असलेल्या जिल्हा बॅंक निवडणुकीच्या मतदानालाच कोरोनाचा अडथळा का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्यात २९ मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्रही निश्चीत झाले असताना प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर करण्यास विलंब का असा सवाल या उमेदवारांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची निवडणूक घेण्यासंबंधी तत्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आम्हाला अवमान याचिका दाखल करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. दरम्यान कॉंग्रेसच्याच काही नेत्यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडी प्रमुखाकडे जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्याचा आग्रह धरला असता त्यांना १९ डिसेंबर ही तारीख देण्यात आल्याचेही सांगितले जाते.लांबलेल्या निवडणुकीचे मूळ दिग्रसमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणूक लांबण्यामागे सत्ताधाऱ्यांचे राजकारण असल्याची चर्चा सहकार क्षेत्रात आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघामुळे ही निवडणूक लांबल्याचे बोलले जाते. तेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांची लढत भाजप समर्थित पॅनलच्या उमेदवाराशी आहे. तेथे महाविकास आघाडीपुढे मोठे आव्हानही आहे. मतदार खेचण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली केल्या जात आहेत. त्यातूनच राजकीय दबाव वापरुन ही निवडणूक लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जाते. या विलंबामागे गायब झालेल्या तीन मतदारांचा शोध घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा हा अजेंडा असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक