शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

आईसगोला आणि बर्फाला मागणी

By admin | Updated: May 23, 2015 00:02 IST

जिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर चढला आहे. आठ दिवसांपासून वाढलेले तापमान अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही.

शीतपेयाच्या दुकानासोबत मोबाईल विक्रेते आपल्याला गल्लीबोळात पाहायला मिळतात. आईसगोला, मटका कुल्फी, बर्फ, पेप्सी विक्रेते शहरभर फिरतात. इतकेच नव्हे तर ग्रामीण भागातही त्यांचा बोलबाला आहे. यामुळे उन्हाळ्यात बर्फाची सर्वाधिक मागणी वाढलेली आहे. रुपेश उत्तरवार यवतमाळजिल्ह्यात उन्हाचा पारा ४५ अंशावर चढला आहे. आठ दिवसांपासून वाढलेले तापमान अद्यापही कमी होण्याचे नाव घेत नाही. उन्हाची दाहकता अंगाची लाही लाही करते आहे. उन्हाच्या तडाक्यातून वाचण्यासाठी प्रत्येक नागरिक सावलीचाच आधार घेतो. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेल्या शितपेयांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे. सध्या दुपारी आणि सायंकाळी बाजाराते तोबा गर्दी पाहायला मिळत आहे.यवतमाळ शहरात जवळपास ४०० शीतपेयांची दुकाने लागली आहेत. या दुकानांमध्ये महाराष्ट्रीयन, उत्तरभारतीय आणि राजस्थानी शीतपेयांचे प्रकार पहायला मिळतात. थेट या प्रांतांमधून आलेल्या परप्रांतीय युवकांनी उदरनिर्वाहासाठी राज्यात शीतपेयाच्या व्यवसायाची निवड केली. याचे कारणेही तसेच आहे. या व्यवसायाला लागणारे भांडवल अत्यल्प आहे. त्यातून दोन पैसे जास्त मिळतात. यामुळे शीतपेयाची अधिक दुकाने परप्रांतीयांनी थाटली आहे. इतर प्रांताच्या तुलनेत राज्यात शीतपेयाला मिळणारे दर रास्त आहेत. यामुळे परप्रांतीय युवकांनी सर्वाधिक शीतपेयाची दुकाने थाटली आहेत. मटका कुल्फी, लस्सी, मोसंबी ज्युसची सर्वाधिक दुकाने परदेशी बांधवांचीच आहे. उत्तर प्रदेशातून जवळपास ४० ते ५० कुटुंब आले आहेत. त्यांनी फुटपाथवर आपला व्यवसाय थाटला आहे. तर काही ठिकाणी परप्रांतीय बांधवांनी महाराष्ट्रीयन बांधवांच्या मदतीने व्यवसाय सुरू केला आहे. उत्तरभारतीयांची ही कला अद्यापही महाराष्ट्रातील कारागिरांना अवगत करता आली नाही. यामुळे उत्तरभारतीयांचे शीतपेयावरचे वर्चस्व अद्यापही कायम आहे.महाराष्ट्रीयन शीतपेयांची पकडपरप्रांतीय शीतपेयासोबत महाराष्ट्रीयन शीतपेय बाजारात आहेत. यामध्ये लिंबू- सरबत, कैरीपना, मठ्ठा, जलजिरा ह्या आयुर्वेदिक शीतपेयाची मागणी बाजारात वाढत आहे. इतकेच नव्हे तर यासाठी लागणारे दही अपुरे पडत आहे. यावर मात करण्यासाठी कंपनीचे दही पॅकिंग विके्रते जिल्ह्यात बोलाविण्यात आले आहे. ऊस, मोसंबी आणि पायनापलपारंपरिक शीतपेयांमध्ये ऊस, मोसंबी आणि पायनापल यांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयाची वर्दळ असणाऱ्या ठिकाणी या शितपेयांच्या गाडया पाहायला मिळतात. काही विक्रेत्यांनी मोबाईल वाहन तयार केले आहे. ज्या चौकात अधिक गर्दी आहे अशा ठिकाणी मोबाईल वाहन थांबते. इतकेच नव्हे तर बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांची मागणी लक्षात घेता हॉकर्स ऊ साचा रसच विक्रीस नेत आहे.टरबुजाला उठाव नाहीबाजारात मोठ्या प्रमाणात टरबूज विक्रीसाठी आले आहेत. मागणीच्या तुलनेत अधिक आवक झाल्याने टरबुजाचे दर घटले आहे. १० रूपये किलो दराने टरबूज विकले जात आहे. यानंतरही टरबुजाचा उठाव मात्र कमी आहे. यामुळे विक्रेतेही काळजीत आहेत. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.पाणपोई नावालाचउन्हाच्या दाहकतेतून सावरण्यासाठी प्रत्येक वाटसरूची तृष्णातृप्ती व्हावी म्हणून पाणपोई चालविण्यात येते. मात्र गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी पाणपोईची संख्या घटली आहे. पाणपोई नसल्याने सर्वसामान्याला पाणी पाऊच अथवा पाणी बॉटल खरेदी करावी लागते. मिनरल वॉटरने सर्वसामान्य नागवलाअलीकडे नवीन चित्र पहायला मिळते आहे. शासकीय कार्यालयापासून ते व्यवसायी प्रतिष्ठानापर्यंत मिनरल वॉटरच्या कॅन पोहचल्या आहेत. यामुळे आपल्या कार्यालयातील कर्मचारी अथवा दुकानातील कामगार लक्षात घेत पाण्याच्या कॅन बोलविण्यात येतात. यामुळे बाहेरील कुठलाही व्यक्ती अथवा ग्राहक येताच पाणी मिळणार किंवा नाही, याची शंकाच आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी बॉटल अथवा पाऊचच विकत घ्यावे लागते.विदेशी पेयापासून ग्राहक चार हात दूरचविदेशी शितपेयात कार्बनाडाय आॅक्साईडचे प्रमाण असते आणि थोडीफार अल्कोहिक मात्रा असते. हे शीतपेय मानवी आरोग्यास घातक असल्याची बाब ग्राहकांना लक्षात येत आहे. यामुळे विदेशी शीतपेयांपासून ग्राहक आता चार हात दूर राहणेच पसंत करत आहेत.कोन, आईस्क्रीम आणि चोकोबारला पसंतीउन्हाळ्याच्या सुट्यात बच्चे कंपनीचा सर्वाधिक ओढा कोन, आईस्क्रीम आणि चोकोबारकडे आहे. रात्रीच्या वेळेस या दुकानांमध्ये ग्राहक मावत नाही. मध्यमवर्गीय ग्राहकांचा सर्वाधिक कल या शीतपेयाच्या दुकानात पाहायला मिळतो.