शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेची मागणी

By admin | Updated: August 5, 2015 00:15 IST

झरी तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मुकुटबन येथे १०८ रूग्णवाहिकेची मागणी होत आहे.

प्रसूतीच्याही संख्येत वाढ : रूग्णांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधारमुकुटबन : झरी तालुक्यातील सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या मुकुटबन येथे १०८ रूग्णवाहिकेची मागणी होत आहे.परिसरात नवनवीन उद्योग व सोबतच विविध कंपन्याचे आगमन होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढ होत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नऊ उपकेंद्र येतात. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा व्याप आता चांगलाच वाढला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज बाह्यरूग्ण विभागात किमान २०० रूग्ण येतात. त्याचबरोबर केंद्रात प्रसूतीच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. येथील आरोग्य केंद्राला एक १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्या आली आहे. मात्र तिचा केवळ प्रसूतीच्या महिलांना ने-आण करण्यासाठीच वापर होतो. सध्या उपलब्ध रूग्णवाहिकेचा दुसऱ्या कोणत्याच कामासाठी वापर होत नाही. क्वचितप्रसंगी ती रूग्णवाहिका उपलब्ध असल्यास गरजू रूग्णांच्या मदतीला ती धावते. विशेष म्हणजे या रूग्णवाहिकेला कायमस्वरूपी चालकही नाही. येथील एका प्रशिक्षित चालकाला रोजंदारीवर बोलावून काम भागविले जात आहे. झरी तालुक्यातीलच शिबला येथे फारशी गरज नसताना १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका देण्यात आली आहे. तेथे भ्रमणध्वनी बरेचदा लागत नसल्यामुळे नेमका कुणाला फोन करून घटनेची माहिती द्यावी, हे कळत नाही. त्यामुळे नागरिकांसह रूग्णांना पेच पडतो. मुकुटबन हे गाव आजूबाजूच्या अनेक गावांशी जोडलेले आहे. येथे दिवसभर बाजारपेठेत गर्दी असते. परिणामी येथे अपघाताची सतत शक्यता असते. एखादी घटना घडल्यानतंर येथील आरोग्य केदं्रात तत्काळ उपचार केला जातो. नुकताच मंगळवारी २८ जुलैला दुचाकीचा अपघात झाला. मांगलीजवळ हा अपघात घडला. घटनास्थळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेला पाठवून जखमींना तत्काळ केंद्रात आणून उपचार करण्यात आले. १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध असती, तर त्यांच्यावर लगेच उपचार करून पुढील केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले असते. मात्र जखमींना खासगी वाहनाने पुढे पाठवावे लागले. परिसरात लहान-मोठ्या घटना सतत घडत असतात. त्यातील जखमींना पुढील उपचारासाठी नेण्याकरिता १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची येथे नितांत गरज आहे. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ क्रमांकाची अत्याधुनिक सुविधा असलेली रूग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी परिसरातील ग्रामस्थांची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)