शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सहा माती नाल्यांचे निकृष्ट बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:15 IST

शासनाच्या कृषी विभागामार्फत पुसद तालुक्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे सुरू असून ती निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार माळआसोली गावात पुढे आला आहे.

ठळक मुद्देकृषी खात्याचे जलयुक्त शिवार : पुसद तालुक्यातील कामे पांढरकवड्याच्या कंत्राटदाराला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शासनाच्या कृषी विभागामार्फत पुसद तालुक्यात विविध ठिकाणी जलयुक्त शिवारची कामे सुरू असून ती निकृष्ट पद्धतीने केली जात असल्याचा गंभीर प्रकार माळआसोली गावात पुढे आला आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयांतर्गत पुसद तालुका कृषी अधिकाऱ्याच्या देखरेखीत जलयुक्त शिवारची कामे सुरू आहेत. माळआसोली गावात सहा माती नालाबांध व शेततळ्याच्या कामाची २५ लाखांची एकत्र निविदा काढली गेली. पांढरकवड्यातील पवन नामक व्यक्तीने २५ टक्के कमी दराने हा कंत्राट मिळविला. मात्र प्रत्यक्षात अवघ्या पाच ते सहा लाखात थातूरमातूर पद्धतीने बंधाºयाची ही कामे उरकली जात आहे. हार्डरॉकचे ब्लास्टिंग करून काळीमाती भरणे आवश्यक असताना प्रत्यक्षात ब्लास्टिंग केलेच गेले नाही. शिवाय मातीही भरली गेली नाही. बोल्डर मुरुम मिश्रीत माती टाकली गेली. या कामावर दोन पोकलॅन्ड असून अवघ्या चार ते पाच दिवसात बंधारा तयार केला जात आहे. या संपूर्ण कामात ३० टक्के मार्जीन असून त्यात कृषी विभागातील काही अधिकारी ‘वाटेकरी’ असल्याचे बोलले जाते. अवघ्या तीन दिवसात बंधाºयाची ही कामे पूर्ण केली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अतिशय निकृष्ट पद्धतीने ही कामे होत असताना पुसद तालुका कृषी अधिकारी पी.एन. राठोड, उपविभागीय कृषी अधिकारी, पर्यवेक्षक, त्यांचे सहायक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.कृषी अधिकाऱ्यांकडून सारवासारवदरम्यान माळआसोलीच्या कामाबाबत जनतेतून ओरड होताच कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन ते काही काळ बंद ठेवले. निकषानुसार काम करून घेणार असल्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. मात्र जिल्ह्यात जलयुक्त शिवारची बहुतांश कामे अशाच पद्धतीने केली जात आहे. यापूर्वी गेल्या काही वर्षात झालेल्या व सध्या सुरू असलेल्या संपूर्ण कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.जिल्ह्यात एकाच कंत्राटदाराची पाच ते सहा कोटींची कामेपांढरकवड्याच्या या कंत्राटदाराने जलयुक्त शिवारची जिल्ह्यात पाच ते सहा कोटींची ८० टक्के कामे स्वत:कडे मिळविली आहे. ‘पवन’ गतीने ही कामे पूर्ण करून देयके काढली जात आहे. या संपूर्ण कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास जलयुक्त शिवारमध्ये शासनाचा निधी नेमका कुठे मुरला हे उघड होण्यास वेळ लागणार नाही. मर्जीतील कंत्राटदारांना कामे देता यावी, यासाठीच जलयुक्तच्या निविदांमध्ये मालकीच्या पोकलॅन्ड, जेसीबी, टँकर या सारख्या यंत्रांची अट घालण्यात आली. माळआसोलीचे हे काम त्यातीलच असल्याचे सांगण्यात येते.उन्हाळ्यात कामे, पावसाळ्यात रेकॉर्डउन्हाळ्यात जलयुक्त शिवारची कामे करायची व पावसाळा झाल्यानंतर या कामाचे रेकॉर्ड तयार करायचे असा कृषी विभागाचा फंडा आहे. माळआसोली हे गाव ड्रायझोनमध्ये आहे. जलयुक्त शिवारमध्ये त्याचा समाविष्ट करण्यासाठी दोन ते तीन वर्ष पाहणीची प्रक्रिया करावी लागते. मात्र या गावात बांधले गेलेले बंधारे हे मनुष्यच नव्हे तर जनावरांच्याही उपयोगी पडणार नसल्याचे सांगितले जाते. जिल्हाधिकाऱ्यांनी या कामावर प्रत्यक्ष भेटी दिल्यास त्यातील घोळ उघड होईल. एकीकडे पाणी फाऊंडेशन वॉटर कप स्पर्धेद्वारे पाणी बचतीचे धडे देत असताना कृषी विभाग मात्र जलयुक्त शिवारच्या कामाचे तीनतेरा वाजवित आहे.