शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुली टक्का घटला

By admin | Updated: April 5, 2017 00:21 IST

यंदा जिल्हा बँकेच्या वणी शाखेच्या कर्ज वसुलीचा टक्का घटला आहे. सन २०१५-१६ मध्ये ९१ टक्के कर्जवसुली झाली होती.

वणी तालुका : जिल्हा बँकेची कामगिरी ८१ टक्के वणी : यंदा जिल्हा बँकेच्या वणी शाखेच्या कर्ज वसुलीचा टक्का घटला आहे. सन २०१५-१६ मध्ये ९१ टक्के कर्जवसुली झाली होती. मात्र सन २०१६-१७ मध्ये केव ळ ८१ टक्के कर्जवसुली करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कर्जमाफ होईल, या अपेक्षेने यंदा शेतकऱ्यांनी कर्जाच्या परतफेडीकडे पाठ फिरविल्याचे मानले जात आहे. असे असले तरी अद्याप शासनाकडून कर्जमाफीचे कोणतेही संकेत नाहीत. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वणी शाखेने सन २०१५-१६ या वर्षांत वणी तालुक्यातील सहा हजार ९६९ शेतकऱ्यांना ४३ कोटी ३५ लाख ४२ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप केले होते. त्यांपैैकी ९१ टक्के कर्जवसुली झाली होती. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये पीक कर्ज घेणाऱ्या सभासदांची संख्या वाढली. सहा हजार ९६९ सभासदांहून ही संख्या सात हजार ७३९ एवढी झाली. या सभासदांना ५१ कोटी ४३ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यांपैैकी मार्चअखेर ४१ कोटी ५२ लाख १० हजार रुपये कर्जवसुली करण्यात आली. त्याची टक्केवारी ८१ आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या वणी शाखेचे तालुका वसुली अधिकारी डी.बी.मोहितकर यांनी ‘लोकमत’ला ुदिली. वणी तालुक्यातील सुमारे ७० सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून हे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी) निसर्गाच्या दुष्टचक्रात अडकला शेतकरी मागील हंगामात निसर्गाच्या दृष्टचक्रामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आले. सुरूवातीला पाऊसच आला नाही. त्यामुळे कुणाला दुबार तर कुणाला तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मध्येच पुन्हा पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे सोयाबीन, कपाशी पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. हाती उत्पादन आले खरे; परंतु शेतमालाला अपेक्षित भावच मिळाला नाही. मागील वर्षी तुरीला १० हजार १२ हजारांपर्यंत भाव होता. यंदा मात्र तो खासगीत चार हजार ते चार हजार ४०० रुपये व नाफेडने पाच हजार ५० रुपये क्विंटलने खरेदी केला. मागील वर्षी सोयाबीनचा भाव तीन हजार ६०० ते तीन हजार ८०० रुपये होता. यंदा सोयाबीन केवळ दोन हजार ७५० ते दोन हजार ८०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. त्यामुळे यंदा शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. त्याचाही परिणाम जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीवर झाला आहे.