शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार, पेन्शनसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:07 IST

कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे.

ठळक मुद्देस्थिती स्फोटक : १५ सप्टेंबरपर्यंत नागरिकांसह प्रशासनाचा कस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे.कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. त्यामुळे शेतकरी सेतू केंद्रांवर गर्दी करीत आहे. मात्र मशीन थम्ब स्वीकारत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनाही अर्ज भरताना थम्ब आणि मोबाईल नंबर तातडीने दाखल करण्याचे आदेश आहे. निराधारांनाही आधार लिंक झाल्याखेरीज मानधन मिळणार नाही. पेन्शनधारकांची केस आधार लिंक झाल्यानंतरच सबमिट होणार आहे.या सर्वांना त्वरित आधारकार्ड जोडण्याच्या सूचना आहेत. परिणामी सर्वांनीच आधार केंद्रांकडे धाव घेतली. सर्वांनाच आधार लिंक करणे सक्तीचे असल्याने त्यांची धावपळ सुरू आहे. आपला क्रमांक तत्काळ लागावा म्हणून अनेक जण अगदी पहाटेपासूनच आधार केंद्रावर गर्दी होत आहे. तथापि जिल्हा मुख्यालयात एकच आधार अपडेट केंद्र आहे. जिल्ह्यातील नागरिक या केंद्रावर गर्दी करीत आहे. मात्र दरदिवशी केवळ १५० अर्ज स्वीकारले जात असल्याने इतरांना रिकाम्या हाताने परतावे लागते. यामुळे जनसामान्यांत आक्रोष वाढत असून परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत आहे.रात्री १० नंतर संकेत स्थळाला गतीजिल्ह्यातले सर्व केंद्रांवर जाऊन आल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून अनेक नागरिक जिल्हा मुख्यालयातील केंद्राकडे धाव घेत आहे. त्यामुळे येथे एकच गर्दी उडते. त्यातही संगणकाची गती धीमी असते. रात्री १० वाजनानंतर संकेतस्थळाची गती वाढते. त्यामुळे गाव पातळीवर रात्री संकेत स्थळावर गर्दी होत आहे. सावळी सदोबामध्ये रात्री १२ वाजतानंतर पोलीस केंद्र बंद करायला लावते. त्यामुळे रात्र जागूनही अनेकांना परत जावे लागते. त्यामुळे जिल्हा पातळीवर आधार केंद्र आणि अर्ज वितरणाची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.कर्जमाफीचे अर्ज दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबर ही तारीख शासनाने घोषित केली. यामुळे प्राधान्याने शेतकºयांचेच अर्ज घेतले जावे, अशा सूचना काढण्यात आल्या आहे. तसे फलक लावले गेले आहे.- नरेंद्र फुलझेलेनिवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ