शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 22:02 IST

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची ८९०.७९ कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा केली आहे.

ठळक मुद्देसहकार मंत्री : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची ८९०.७९ कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा केली आहे. अनावधानाने जे शेतकरी यातून सुटले आहेत, अशा शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारावे. निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, अमरावती विभागीय सहनिबंधक राजेश दाभेराव, लेखा परिक्षण विभागाचे सहनिबंधक जे.व्ही. घुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन उपस्थित होते.निकषात बसणारे शेतकरी पुढील टप्प्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरविता येतील, असे सांगून ना.सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांकडून कुठल्याही परिस्थितीत ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज वसूल करायचे नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून पुढचे कर्ज घेण्यास ते शेतकरी पात्र झाले पाहिजे. ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक गावात किमान एक विविध कार्यकारी संस्थेची नोंदणी करावी, ज्या विविध कार्यकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात चार ते पाच पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे अशा संस्थांचे विभाजन करण्याबाबत सहायक निबंधकांनी कार्यवाही करावी, यवतमाळ जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेची व्याप्ती वाढवावी, असे निर्देश सहकार मंत्र्यांनी यावेळी दिले. अवैध सावकारी हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे एक कारण आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वैध सावकारांकडून प्रचलित व्याजदारापेक्षा वाढीव व्याज आकारणी होत असेल, तर अशा सावकारांवर कायद्यानुसार कारवाई करावी. जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणीबाबत व कर्जाच्या व्याजदरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या. रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करा, अशा सूचना ना.देशमुख यांनी दिल्या. यावेळी सहकारी संस्थेचे उपनिबंधक गौतम वर्धन यांनी सहकार विभागाचे आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी बँकेबाबत सादरीकरण केले. बैठकीला सहायक निबंधक अर्चना माळवे, बाजार समित्यांचे सचिव, तालुक्याचे सहायक निबंधक, सहकार व पणन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.