शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी स्पर्धेतील पाचही सामन्यांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 22:07 IST

मागील तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत होणाºया वादाची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. ....

ठळक मुद्देजिल्हा नेहरू कप व शालेय हॉकी : पंचाच्या निर्णयावर आक्षेप

नीलेश भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मागील तीन ते चार वर्षांपासून दरवर्षी जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत होणाºया वादाची परंपरा याहीवर्षी कायम राहिली. येथील अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणात आयोजित नेहरू कप व शालेय हॉकी स्पर्धेत झालेल्या पाचही सामन्यात पंचाच्या निर्णयावर घेतलेल्या आक्षेपांनी सामन्यात व्यत्यय येऊन वाद निर्माण झाल्याने ही स्पर्धा चांगलीच वादग्रस्त ठरली.क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ व हॉकी डिस्ट्रीक असोसिएशन आॅफ यवतमाळ यांच्यावतीने या स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू कप हॉकी १५ व १७ वर्ष मुले-मुली आणि शालेय १४, १७, १९ वर्ष वयोगट मुले-मुली या दोन्ही स्पर्धेत जिल्ह्यातून विवेकानंद हायस्कूल, साई विद्यालय, राणी लक्ष्मीबाई विद्यालय, अमोलकचंद कनिष्ठ महाविद्यालय व अभ्यंकर कन्या शाळा, असे केवळ पाच संघ सहभागी झाले होते.जिल्ह्यात हॉकी खेळाच्या दोन संघटना कार्यरत असल्याने प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी दोन्ही संघटनेच्या सहमतीने सदर स्पर्धेचे आयोजन केले होते. तांत्रिक बाजूची जबाबदारी डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन आॅफ यवतमाळ या संघटनेकडे दिली. शालेय हॉकी स्पर्र्धेेच्या १९ वर्ष गटातील मुलींचा एकमेव सामना अमोलकचंद महाविद्यालय विरुद्ध अभ्यंकर संघादरम्यान मध्यंतरानंतर पंचानी दिलेल्या निर्णयावर अभ्यंकर संघाच्या मार्गदर्शकांनी तीव्र आक्षेप घेतला. पेनॉल्टी कॉर्नरची मागणी करीत संघातील खेळाडूंना मैदानावरच बसवून ठेवले. महत्वाचे म्हणजे अभ्यंकर संघ १-० गोलने आघाडीवर होता. स्पर्धा संयोजक व मार्गदर्शकांमध्ये तोडगा न निघाल्याने सामना होऊ शकला नाही. शेवटी गोल आधारावर अभ्यंकर संघालाच विजयी घोषित केले.नेहरू कप १७ वर्ष वयोगटात मुलींच्या राणी लक्ष्मीबाई विरुद्ध अभ्यंकर संघादरम्यानच्या सामन्यात पंच निर्णयावर बराच वाद झाला. सामना थांबविण्यात आला. एक वेळ पंचानेही शिटी फेकून पंचगिरी न करण्याचा निर्णय घेतला. साई विद्यालय विरुद्ध विवेकानंद सामन्यात पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेतला. विशेष म्हणजे स्पर्धेच्या ठिकाणी क्रीडा कार्यालयाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता. विशेष असे की, विभागीय हॉकी स्पर्धा यवतमाळ येथे १६ ते १८ सप्टेंबरला होणार आहे. हॉकी स्पर्धेतील वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा कार्यालयाला विभागीय स्पर्धा आव्हान ठरणार आहे.