शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

विकास कामांच्या श्रेयावरून नगरपरिषदेत वाद

By admin | Updated: August 13, 2015 03:08 IST

येथील नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषद घेऊन २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय घेतल्यावरून नगर परिषदेत वाद उफाळून आला आहे.

नगराध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप : शहर विकास आघाडीची बैठक गाजलीयवतमाळ : येथील नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषद घेऊन २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय घेतल्यावरून नगर परिषदेत वाद उफाळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी शहर विकास आघाडीची बैठक पार पडली. त्यात या श्रेयासोबतच अन्य मुद्यांवरही चर्चा गाजली. नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे गटनेते मनीष दुबे यांच्या कक्षात ही बैठक झाली. यावेळी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, बसपाचे काही सदस्य उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत अनेक सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. नुकतेच नगराध्यक्षांनी २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय स्वत:कडे घेतले. मग आमचे काहीच अस्तित्व नाही का असा प्रश्न काही सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला. नगर परिषदेचे प्रशासन कुणालाही विश्वासात न घेता परस्परच निर्णय घेत असल्याबाबत आक्षेप नोंदविला गेला. शौचालयांना जाळ्या बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र त्याची माहिती खुद्द संबंधित सभापतींनाही दिली गेली नाही. नगर परिषदेच्या विषय पत्रिकेमध्ये नगरसेवकांनी वार्डावार्डातील सूचविलेली कामे समाविष्ट केली जात नाही. एक नाली आणि एक रस्ता एवढ्याच पुरते नगर सेवकांना मर्यादित ठेवले जाते, अशी भावना काही सदस्यांनी बोलून दाखविली. मुख्याधिकारी रवींद्र पांढरे ऐन कामाच्या वेळी हजर राहत नाही, अशाही तक्रारी होत्या. या बैठकीला शहर विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (कार्यालय प्रतिनिधी) यवतमाळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी १३ आॅगस्ट रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीच्या सभेला महत्व दिले जात आहे. गुरुवारची सर्वसाधारण सभाही गाजविण्याचे सूतोवाच शहर विकास आघाडीच्या बैठकीत काही सदस्यांनी केले. व्हीडीओ चित्रीकरणात ही सभा होणार आहे. मागील सभेच्या इत्तीवृत्ताची इत्यंभूत अंमलबजावणी झाली की नाही, जुने ठराव कार्यान्वित केले गेले की नाही याची आधी शहानिशा केली जाईल, त्यानंतरच पुढील सभा चालवू दिली जाईल, अशी भूमिका बैठकीत घेतली गेली. विधीमंडळ महिला हक्क समिती धडकणारराज्य विधिमंडळाची महिला हक्क समिती जिल्ह्यात येणार आहे. ही समिती नगर परिषदेलाही भेट देईल. मात्र या नगर परिषदेत महिला सदस्यांवरच विविध स्तरावर अन्याय होत असल्याची भावना पुढे आली. नगर परिषदेचे महिलांसाठी असलेले प्रसाधनगृह कुलूप बंद राहते, त्याच्या चाबीसाठी महिला सदस्यांना फिरावे लागते, असा मुद्दाही शहर विकास आघाडीच्या बैठकीत पुढे आला. यासह अन्य मुद्दे विधीमंडळ महिला हक्क समितीपुढे गाजविण्याची तयारी करण्यात आली आहे.