शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जखमी रूपालीचा अखेर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 22:40 IST

उन्मत्त होऊन दुचाकी चालविणाऱ्या किशोरवयीनांना हटकल्यानंतर त्या किशोरवयीनांनी जाविणपूर्वक धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या रुपाली प्रमोद वासेकर (४२) या महिलेचा अखेर शनिवारी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देबाईकर्सचा उन्मत्तपणा जीवावर बेतला : चार अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : उन्मत्त होऊन दुचाकी चालविणाऱ्या किशोरवयीनांना हटकल्यानंतर त्या किशोरवयीनांनी जाविणपूर्वक धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या रुपाली प्रमोद वासेकर (४२) या महिलेचा अखेर शनिवारी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी मंजूषा पुरूषोत्तम गोहोकार यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात किशोरवयीनांविरूद्ध भादंवि २७९, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला. रूपालीच्या निधनाची वार्ता कळताच, शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वणी पोलीस ठाण्यात जाऊन रूपालीचे पार्थिव वणीत येईपर्यंत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तत्पूर्वीच पोलिसांनी आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. दुपारी ११ वाजेपर्यंत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चौैकशीसाठी चौैघांना ताब्यात घेतले असून यांपैकी दोन अल्पवयीन आरोपींनी पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या एका पथकाने घटनास्थळ परिसरातील सर्व सीसीटिव्ही कॅमऱ्याचे फुटेज मिळविले. त्यात डॉ.संचिता नगराळे यांच्या रुग्णालयाच्या आवारातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये संपूर्ण घटना कैैद झाल्याचे निदर्शनास आले. या फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपींपर्यंत पोहचू शकले.मृत रूपाली ही वणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कॉंग्रेसचे संचालक प्रमोद वासेकर यांची पत्नी असून त्यांना दोन मुली आहेत. शनिवारी दुपारी रूपालीचे पार्थिव वणी येथील निवासस्थानी आणल्यानंतर अंत्यदर्शनासाठी शेकडोंनी गर्दी केली. विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी येथील मोक्षधामात शेकडोंच्या उपस्थितीत शोकाकूल वातावरणात रूपालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.कठोर कारवाईची सर्वस्तरातून मागणीघडलेल्या घटनेबद्दल वणी शहरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपी अल्पवयीन असले तरी परिणामाची जाणिव असतानाही त्यांनी गुन्हा केला. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वस्तरातून करण्यात आली. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथे बघ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. संशयितांचे नातलगही तेथे उपस्थित होते. सर्व संशयित आरोपी हे वणी शहरातील देशमुखवाडी परिसरातील रहिवासी आहेत.बाईकर्सवर थेट खुनाचा गुन्हा का नाही?रूपाली वासेकर अपघाती मृत्यू प्रकरणात बाईकर्सस्वारांवर थेट खुनाचाच गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. या मोटरसायकलस्वारांचा हलगर्जीपणा नव्हेतर त्यांनी जाणीवपूर्वक हा अपघात घडवून आणला आहे. त्यामुळे त्यांचा जीव घेण्याचा हेतू स्पष्ट होत असल्यानेच त्यांच्यावर भादंवि ३०२ दाखल करावा, अशी मागणी होत आहे. ही मुले अल्पवयीन असतील तर गाडी मालकावर कारवाईची मागणी होत आहे.