शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
2
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
3
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
4
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
5
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
6
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
7
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
8
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
10
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
11
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
12
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
13
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
14
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
15
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
16
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
17
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
18
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
19
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
20
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."

पाण्याच्या शोधात बिबट बछड्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 23:18 IST

पाण्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटाच्या दोन बछड्यांपैकी एकाचा मृत्यू तर दुसरा अत्यवस्थ असल्याची घटना महागाव तालुक्यातील वाकान शेतशिवारात शुक्रवारी घडली.

ठळक मुद्देवाकान शेतशिवारातील घटना : दुसऱ्या बछड्याची प्रकृती गंभीर, वन विभागाचे अधिकारी तळ ठोकून

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : पाण्याच्या शोधात भरकटलेल्या बिबटाच्या दोन बछड्यांपैकी एकाचा मृत्यू तर दुसरा अत्यवस्थ असल्याची घटना महागाव तालुक्यातील वाकान शेतशिवारात शुक्रवारी घडली. पाण्याच्या शोधात असलेल्या बिबटापासून हे दोन बछडे भरकटून एका शेतात सकाळी आढळून आले होते. वन विभागाने मादी बिबटाचा शोध जारी केला असून अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून आहेत. दरम्यान, बिबटाच्या बछड्यांना पाहण्यासाठी दिवसभर शेतात परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती.महागाव तालुक्यातील जंगलांमधील जलस्रोत आटले आहे. त्यामुळे वन्यजीव पाण्यासाठी कासावीस झाले आहे. पाण्याच्या शोधात शेतशिवाराकडे धाव घेत आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाकान-कोनदरी शिवारात माळहिवरा रस्त्यावर संतोष राठोड, दीपक सोळंके यांच्या शेताजवळ एक बिबट मादी पाण्याच्या शोधात असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे शेतकºयांची पाचावर धारण बसली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एका शेतातील दोन दगडामध्ये बिबटाचा नवजात बछडा अडकून असल्याचे काही शेतकºयांच्या लक्षात आले, तर दुसरा त्याच परिसरात होता. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी येईपर्यंत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती.दोन्ही बछडे वेगळे झाल्याने मादी बिबट निश्चितच येणार म्हणून वनविभागाने ट्रॅप कॅमेरे त्या परिसरात लावले आहे. सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास नागरिकांना बिबटाच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. दरम्यान, महागावचे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ.डी.जी. वानोळे तेथे पोहोचले. त्यांनी या बछड्यांची तपासणी केली असता त्यापैकी एका बछड्याला मृत घोषित केले, तर दुसºया बछड्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.या बछड्याचे शवविच्छेदन शनिवारी करण्यात येणार आहे, तर दुसरा बछडा वृत्तलिहिस्तोवर शेतातच असून वन विभागाचे १५ जणांचे पथक त्यावर नजर ठेवून आहे. बिबट येण्याची ते प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे हे दोन्ही बछडे चार ते पाच दिवसापूर्वी जन्मलेले असावे. त्यांचे डोळेही उघडले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाण्याच्या शोधात एका नवजात बछड्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.जंगलातील जलस्रोत आटलेमहागाव तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश जंगलातील जलस्रोत आटले आहे. पाण्याच्या शोधात वन्यजीव सैरभैर झाले आहे. महागाव तालुक्यातील वाकान शिवारात आढळलेले बिबट पाण्याच्याच शोधात या परिसरात आले होते. ज्या ठिकाणी शेतकºयांना बिबटाचे गुरुवारी दर्शन झाले. त्या परिसरात पाणी आहे. त्यामुळे पाण्याच्या भटकंतीत एका नवजात बछड्याचा प्राण गेला. वन विभागाने पानवठे ठिकठिकाणी तयार केले असले तरी त्याची योग्य देखरेख होत नसल्याने अनेक पानवठेही कोरडे पडले आहे. परिणामी वन्यजीव पाण्याविना तडफडून मरत आहे.

टॅग्स :Tigerवाघ