लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र आता दोषी कृषी केंद्र संचालकांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्यानेच आतापर्यंत एकाही कृषी केंद्र चालकावर कारवाई झाली नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रपरिषदेत केला.विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबियांना भेटून आल्यानंतर ते पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या मृत्यूला शासनाचे धोरणच जबाबदार असल्याचे म्हटले. यामागे भले मोठे रॅकेट असून मोठमोठ्या कंपन्या, डिलर, कृषी केंद्र संचालक, कृषी अधिकारी आणि कृषी मंत्री या सर्वांचा समावेश असल्याचे सांगून या सर्वांचा म्होरक्या नांदेड येथे आहे. तेथूनच सर्व सूत्रे हलविले जात असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. कृषीमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यात घडलेल्या या प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजिनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.जिल्ह्याचे पालकमंत्री हे दादागिरीची भाषा करीत असून शासनाने अदृश्य आणीबाणी लादली आहे, सत्तेच्या उन्मादामुळे शेतकरी-शेतमजूरांना यांनी वाºयावर सोडले असून नोटाबंदीत सर्वाधिक पैसे भाजपाच्या लोकांनी कमविल्याचा आरोपही त्यांनी केला. विषबाधेमुळे मृत्यू पावलेल्या शेतकरी कुटुंबियांना किमान पाच लाख रुपये द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अमेरिकन कंपनीने रिजेक्ट केलेली फवारणीची औषधी या जिल्ह्यात आल्याने हा प्रकार घडल्याचा संशय तुपकर यांनी व्यक्त केला. शेतकºयांना न्याय न मिळाल्यास भविष्यात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचेही रविकांत तुपकर म्हणाले.पत्रपरिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव, अमरावती जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ, देवानंद पवार, संतोष अरसोड आदींची उपस्थिती होती.
विषबाधेमुळे शेतकºयांचा मृत्यू हे सामूहिक हत्याकांडच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:06 IST
जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा होऊन आतापर्यंत १९ शेतकºयांचा मृत्यू झाला आहे, हे शासन आणि कृषी विभागाने घडवून आणलेले हत्याकांडच आहे, .....
विषबाधेमुळे शेतकºयांचा मृत्यू हे सामूहिक हत्याकांडच
ठळक मुद्देरविकांत तुपकर : पालकमंत्र्यांकडून कृषी केंद्रांना वाचविण्याचा प्रयत्न