शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ओलित करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 22:04 IST

शेतात ओलित करताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कवठा बु. येथे रविवारी घडली.

ठळक मुद्देकवठाची घटना : लोंबकळणाऱ्या तारांनी घात

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शेतात ओलित करताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कवठा बु. येथे रविवारी घडली. लोंबकळणाऱ्या वीज तारांनी शेतकऱ्याचा घात केला. शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला.राजू रामकृष्ण जुनघरे (४०) रा. कवठा बु. असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात रविवारी ओलित करीत होते. ओलित करताना लोखंडी पाईप उचलताना तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. काही वेळातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला वीज वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई-वडील असा आप्त परिवार आहे.दरम्यान वीज वितरण कंपनीचे अभियंता सौरभ नैताम यांनी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात विलास वामनराव जुनघरे यांनी माझा पुतण्या तुमच्या हलगर्जीपणामुळे मरण पावला, असे म्हणत धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. त्यावरून पारवा पोलिसांनी विलास जुनघरेविरुद्ध गुन्हा केला आहे. या घटनेने वीज वितरणविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.