शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पत्नीचा मृतदेह पाहून पतीनेही सोडला श्वास!

By admin | Updated: April 4, 2017 00:03 IST

आयुष्यभर संकटे आली. गरिबी, आजार. तरीही पती-पत्नी हरले नाही. एकमेकांचे साथी बनत एकमेकांना धीर देत जगले. पण विवंचना त्यांना आतून पोखरत राहिली. वयही थकलेच होते.

नेरमध्ये शोककळा : चंद्रकला-सखाराम यांना एकाच चितेवर भडाग्नीनेर : आयुष्यभर संकटे आली. गरिबी, आजार. तरीही पती-पत्नी हरले नाही. एकमेकांचे साथी बनत एकमेकांना धीर देत जगले. पण विवंचना त्यांना आतून पोखरत राहिली. वयही थकलेच होते. अशातच रविवारी पत्नीने श्वास सोडला. तिचा मृतदेह पाहून तिच्याशेजारीच रडत-रडत पतीनेही डोळे मिटले. एका सुस्वभावी वृद्ध दाम्पत्याचा हा अखेरचा प्रवास नेरवासीयांच्या मनात भावनिक कोलाहल निर्माण करून गेला.सखाराम कुनगर आणि चंद्रकला कुनगर, असे या मृत दाम्पत्याचे नाव आहे. यवतमाळ येथील ‘लोकमत’चे जुने वितरक सखाराम कुनगर हे कालांतराने नेर येथे स्थायिक झाले. येथील बसस्थानकावर बुक स्टॉल चालवून आपल्या कुटुंबाचा भार वाहत होते. मात्र व्यवसायातील नुकसानामुळे त्यांची परिस्थिती सावरली नाही. पुढे ते गाडीवर ब्रेड-बिस्किटे विकून उपजिविका चालवू लागले होते. अशातच २० वर्षांपूर्वी त्यांची पत्नी चंद्रकला लकव्यामुळे दोन्ही पायांनी अपंग झाल्या. या दाम्पत्याच्या वेदनेचा खरा प्रवास इथूनच कठीण बनला. सखाराम पूर्ण वेळ पत्नीच्या सेवेत घालवू लागले. त्यांचा मुलगा जीवन नेरच्या बसस्थानकावर खरमुरे विकून आपल्या आईवडिलांचा सांभाळ करीत होता. उपवर मुलीचा विवाह होऊन तुटल्याने गेल्या काही महिन्यांपासून सखाराम आणि चंद्रकला हे दोघेही अस्वस्थ होते. रविवारी दुपारी ४ वाजता चंद्रकलाने शेवटचा श्वास घेतला. आपल्यावर प्रेम करणऱ्या सहचारिणीचा मृतदेह पाहून सखाराम हमसून हमसून रडले. अन् रडत-रडत त्यांनीही पत्नीशेजारीच डोळे मिटले. दोघाही पती-पत्नीला एकाच चितेवर भडाग्नी देण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)