शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पुरलेले प्रेत बाहेर काढले

By admin | Updated: January 24, 2015 02:00 IST

मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खूनच झाल्याची तक्रार महागाव पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी पुरलेले प्रेत शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आले.

महागाव/बिजोरा : मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खूनच झाल्याची तक्रार महागाव पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी पुरलेले प्रेत शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, पित्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. ही घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे घडली. बेलदरी येथील वैभव मुरलीधर जाधव (१६) याचा १६ जानेवारी रोजी अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान २१ जानेवारी रोजी वैभवचे वडील मुरलीधर जाधव यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खून केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. तसेच प्रेताचे शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शुक्रवारी शवविच्छेदनासाठी पुरलेले प्रेत बाहेर काढले. तालुका वैद्यकीय अधिकारी जे.एम. पठाण यांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालानुसार वैभवच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. पुरलेले प्रेत बाहेर काढणार असल्याने बेलदरी येथे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी २ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी प्रेत बाहेर काढले. त्यावेळी वैभवचे वडील आणि भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते. शवविच्छेदन करतेवेळी महागावचे तहसीलदार विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील, ठाणेदार पी.बी. शेळके, डॉ.जी.जी. खारोडे आदी उपस्थित होते. दरम्यान वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मधुकर गुलाब जाधव याला ताब्यात घेतले. (वार्ताहर)