शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

स्टेट बँक चौकात भरदिवसा वाटमारी

By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST

धामणगाव येथून तीन ते चार कुरिअर घेऊन आलेल्या एका व्यावसायिक तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांच्या

यवतमाळ : धामणगाव येथून तीन ते चार कुरिअर घेऊन आलेल्या एका व्यावसायिक तरुणाच्या तोंडावर स्प्रे मारून आणि धारदार शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न करून बोलेरो वाहनातून आलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्याचे एक कुरिअर पळविले. ही घटना शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील अत्यंत वर्दळीच्या स्टेट बँक चौकात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गौरव रमेश भिमजीयानी (२२) रा. धामणगाव रेल्वे असे कुरिअर लंपास झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तो धामणगाव येथे आंगडिया कुरिअर सर्व्हिसचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. नेहमीप्रमाणे विदर्भ एक्सप्रेस या रेल्वेने तीन ते चार पार्सल आणि कुरिअर आले होते. ते यवतमाळ येथे संबंधितांना देण्यासाठी तो एसटी बसने सकाळी निघाला. ८.३० वाजताच्या सुमारास तो स्टेट बँक चौकात उतरला. यावेळी त्याने मोठ्या पिशवीतील कुरिअर आणि पार्सल काढून ते एका आॅटोरिक्षात ठेवले. यावेळी मागावर असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने त्याच्या तोंडावर स्प्रे मारला. त्यानंतर धारदार चाकूने हल्लाही केला. मात्र सुदैवाने त्याने तो हल्ला परतून लावला. परंतु या झटापटीत हिरव्या रंगाच्या बॉक्समध्ये असलेले एक पार्सल घेऊन बोलेरो वाहनातून पोबारा केला. यावेळी त्याने आॅटोरिक्षाने त्या वाहनाचा पाठलागही केला. मात्र बसस्थानक चौकातून ते वाहन दिसेनासे झाले. घटनेनंतर त्याने या प्रकरणी शहर पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि ३७९ कलमान्वये गुन्हा नोंदविला. (स्थानिक प्रतिनिधी)