शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साईटवरून दारव्हा झाले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 21:38 IST

कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी कर्जमुक्ती : उरले दोन दिवस, कसे होईल अर्ज आॅनलाईन, रोष वाढला

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : कर्जमुक्तीसाठी शेतकºयांना ज्या साईटवरून आॅनलाईन अर्ज भरल्यास सांगण्यात आले. त्या साईटवर दारव्हा गावच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहो. त्यामुळे शहरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, सर्व शेतकरी संतप्त झाले आहेत.विशेष म्हणजे हे अर्ज सादर करण्यासाठी १५ सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता दोनच दिवस उरले असून, एवढ्या कमी वेळात हजारो शेतकºयांचे अर्ज कसे आॅनलाईन भरले जाणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घ्यायचा झाल्यास पात्र शेतकºयांना सेतू केंद्र, इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन आॅनलाईन अर्ज करावे लागतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ठराविक नमुन्यात प्रत्येकाची माहिती भरावी लागते. प्राथमिक माहिती भरल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे नाव, गावाचे नाव असा पर्याय येतो. परंतु, दारव्ह्याच्या शेतकºयांना दारव्हा नगरपालिका असल्याने ग्रामपंचायतीच्या रकान्यात गावाचे नाव टाकता येत नाही आणि टाकल्यास अर्ज स्वीकारल्या जात नाही. दारव्हा या गावाचे नावच साईटवर नसल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आहेत. याबाबत काही शेतकºयांची तहसीलदारांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर टाकली. त्याचप्रमाणे सेतू केंद्र व इंटरनेट कॅफेवाल्यांनीसुद्धा त्यांना निवेदन सादर केले असून, त्यामध्ये दारव्हा खंड १ व खंड २ चे नाव सदर वेबसाईटमध्ये समाविष्ट नाही. त्यामुळे आम्ही केवळ शेतकºयांचे रजिस्ट्रेशन करून ठेवत आहो. पुढे काही समस्या उद्भवल्यास पूर्ण अर्ज कमी कालावधीत भरता येणार नाही, असे स्पष्ट कळविण्यात आले आहे.तहसीलदारांनी साईट अपडेट होईल, असे शेतकºयांना सांगितले होते. परंतु अद्यापही दारव्हा शहराचे नाव समाविष्ट न झाल्याने शेतकरी अडचणीत सपडले आहे.दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊनगेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे कर्जमुक्तीच्या अर्जाचे कामकाज ठप्प पडले आहे. सेतू केंद्र इंटरनेटवर शेतकºयांच्या रांगा लागल्या आहे. शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे दारव्हा तालुक्यात स्फोटक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.