शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

समायोजनासाठी ‘तारीख पे तारीख’

By admin | Updated: September 2, 2016 02:33 IST

जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनाची अवस्था ‘लांडगा आला रे आला...’

शिक्षक त्रस्त : समायोजनाची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ सारखीवणी : जिल्ह्यातील खासगी माध्यमिक शाळांमधील अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनाची अवस्था ‘लांडगा आला रे आला...’ अशी झाली आहे. शिक्षण विभाग सर्व कामे बाजूला सारून वर्षभरापासून केवळ संचमान्यता व अतिरीक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या मागे लागून आहे. मात्र अतिरीक्त शिक्षकांचे समायोजन आज होणार-उद्या होणार, या चर्चेने शिक्षकही आता त्रस्त झाले आहेत.खासगी शाळातील संचमान्यता आॅनलाईन मिळू लागल्या. मात्र २०१४-१५ व २०१५-१६ ृच्या संचमान्यतामध्ये अनेक त्रुटी दिसून येत होत्या. त्यामुळे शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी शासन निर्णयात बदल करून अनेक शाळांच्या संचमान्यता अनेकदा बदलवून दिल्या. उच्च माध्यमिकच्या २०१५-१६ च्या संचमान्यता तर अखेर आॅफलाईनच करून द्याव्या लागल्या. २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार अतिरीक्त शिक्षकांची संख्या ठरविण्यात आली. जिल्ह्यात २००-२५० शिक्षक अतिरीक्त दाखविण्यात आले. त्यांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र त्यामध्येही रोस्टर, विषय, सेवाज्येष्ठता याला बाजूला सारून काही संस्थांनी ज्येष्ठ शिक्षकांना अतिरीक्त ठरविले. त्यामुळे ही यादीही वांद्यात आली. त्यामुळे अतिरीक्त शिक्षक व त्यांच्या मुख्याध्यापकांना एकाचवेळी बोलावून शिक्षणाधिकाऱ्यांनी पुन्हा अतिरीक्त शिक्षकांची पडताळणी केली. त्यानुसार ही यादी १९४ शिक्षकांवर आली. अतिरीक्त शिक्षक व रिक्त जागेच्या यादीत दोष असू नये म्हणून पुन्हा मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन माहिती भरून घेण्यात आली. त्यानुसार प्रसिद्ध झालेल्या यादीवर आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या. काही शिक्षकांनी व रिक्त जागा असणाऱ्या संस्थांनी हरकती घेतल्याने त्यांची सुनावणी घेण्यात आली. २० आॅगस्टपर्यंत अतिरीक्त शिक्षक व रिक्त जागांची यादी अपडेट झाल्याने २४ व २५ आॅगस्टला अतिरीक्त शिक्षकांच्या रिक्त जागांवर समायोजन केले जाईल, असा संदेश शाळांना पाठविण्यात आला. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे २४ व २५ तारखेचे समायोजन रद्द करण्याचा संदेश २३ आॅगस्टला पाठविण्यात आला. त्यानंतर पुन्हा काही शिक्षक व संस्थाच्या हरकती असल्यास त्यांना दुरूस्तीची संधी देण्यात आली. तेव्हा पुन्हा १२ शिक्षकांनी आक्षेप टाकले. हे आक्षेप दुरूस्त करून ३० व ३१ आॅगस्टला समायोजन केले जाईल. अतिरीक्त शिक्षक व रिक्त जागांचे मुख्याध्यापकांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असा शिक्षणाधिकाऱ्यांचा संदेश व्हायरल झाला. मात्र दुरूस्तीचा टॅब उपलब्ध न झाल्याने ३० आॅगस्टचे समायोजन रद्द करण्यात आल्याचा संदेश पाठविण्यात आला. आता ३ सप्टेंबरला समायोजन करण्यात येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)