शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा ठाण्यात ८१ गावांचा भार केवळ ६० पोलिसांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 21:30 IST

पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते.

ठळक मुद्देतारेवरची कसरत : गुन्हे नियंत्रणासाठी महिला ठाणेदार आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : पोलीस दप्तरी अतिसंवेदनशील अशी नोंद असलेल्या दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल ८१ गावांचा समावेश आहे. परंतु या गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केवळ ६० पोलीस उपलब्ध आहेत. तुटपुंज्या मनुष्यबळामुळे सामाजिक सलोखा व शांतता राखताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. या कमी मनुष्यबळातही दारव्ह्याच्या पहिल्या महिला ठाणेदार रिता उईके यांचे गुन्हेगारी नियंत्रण व सामाजिक शांततेसाठी परिश्रम सुरू आहेत. त्यांच्या प्रयत्नांना समाजातूनही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.दारव्हा पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रण व एसपींच्या आदेशावरून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न चालविले आहे. त्यासाठी नियमित कामकाज व तपास सांभाळून वेळ मिळेल तेव्हा मोहिमा राबविल्या जात आहे. त्यामुळे प्रॉपर्टी व शरीरासंबंधीचे गुन्हे बऱ्यापैकी नियंत्रणात आले आहेत. घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठीही पोलिसांचे प्रयत्न होत आहेत. त्यात त्यांना बºयापैकी यशही मिळते आहे.आगामी सण, उत्सवाचा काळ बघता ठाणेदार रिता उईके यांनी दारव्हा ठाण्यातील परंपरागत एकाधिकारशाही पद्धत बंद करून अधिकाºयांचे विकेंद्रीकरण केल्याने पोलीस यंत्रणेतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठ महिन्यात दारू, मटका, जुगार विरोधात कारवाई करून ३४६ गुन्हे नोंदविले गेले असून त्यात पावणेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ठाणेदार उईके यांनी आतापर्यंत विविध कलमान्वये ५०० वर व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व अन्य कायद्यान्वये कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाºया ६२ चालकांना पकडण्यात आले. मोटार वाहन कायद्यांतर्गत ७५० व्यक्तींवर कारवाई करून दीड लाखांचा दंड वसूल केला गेला. गेल्या आठ महिन्यात कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारी एकही घटना दारव्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली नसल्याचे ठाणेदार रिता उईके यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सर्व सण, उत्सव शांततेत पार पाडण्यात दारव्हा पोलिसांना यश आले आहे. या कामी आपल्याला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.