शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पंचायत विभागाची पंचाईत

By admin | Updated: August 30, 2014 02:08 IST

जिल्हा परिषदेचा संपूर्ण डोलारा हा पंचायत विभागावर उभा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या विभागालाच घरघर लागली आहे.

यवतमाळ : जिल्हा परिषदेचा संपूर्ण डोलारा हा पंचायत विभागावर उभा आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या विभागालाच घरघर लागली आहे. येथील कामाचा व्याप अधिक असल्याने अधिकारी व कर्मचारी तेथे काम करण्यास तयार नाही. प्रत्येक जण वेळ काढून सोयीच्या ठिकाणी जाण्याच्याच मानसिकतेत पंचायत विभागात येतो. यामुळे येथील कामकाज पूर्णत: ढेपाळले आहे. जिल्ह्यातील १ हजार २०७ ग्रामपंचायतींच्या विकासाचे नियोजन आणि प्रशासकीय कामकाजाचे देखरेख पंचायत विभागातून केली जाते. पंचायत विभागातून जनसुविधा, पर्यावरण संतुलित ग्रामसमृद्धी योजना, कर वसुली, रोजगार हमी योजनायासह इतरही कामे चालतात. शिवाय ग्रामपंचायत पातळीवर झालेल्या अपहाराची चौकशीही याच विभागाकडून केली जाते. ग्रामसेवकांची आस्थापना पंचायत विभागातच आहे. त्यामुळे या सर्वांचा लेखाजोखाही येथेच ठेवावा लागतो. ग्रामीण भागातून विकासाच्या कामात अपहार झाल्याच्या असंख्य तक्रारी पंचायत विभागात प्राप्त होतात. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत स्तरावरून कर वसुली, पाणीपट्टी वसुली यावरही नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकारी पाहिजे. जनसुविधेतून कोट्यवधीचा निधी दिला जातो. या निधीचे नियोजन ग्रामसेवकाकडून केले जात आहे. त्या दर्जाचा अधिकारीच नसल्याने कसेबसे काम काढून घेण्याचे प्रयत्न सुरू आहे. पंचायत विभागातील उपमुख्याधिकारी डॉ.प्रशांत रूमाले यांची बदली झाल्यानंतर पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही. जिल्ह्यातील १६ पंचायत समित्या आणि १ हजार २०७ ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवताना अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होते. मुळात पंचायत विभागातील पदस्थापनेची पुनर्रचना करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रयत्न होताना दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)