शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार हेक्टर महसूल जमिनीचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: August 27, 2016 00:57 IST

तालुक्यातील ई-क्लासच्या ४ हजार १९१.१९ हेक्टर जमिनीची काय स्थिती आहे याबाबत तहसीलदारांनी तलाठ्यांकडे अहवालाची मागणी केली.

दप्तर दिरंगाई : तलाठी रजिस्टरमध्ये एकाही अतिक्रमणाची नोंद नाहीमहागाव : तालुक्यातील ई-क्लासच्या ४ हजार १९१.१९ हेक्टर जमिनीची काय स्थिती आहे याबाबत तहसीलदारांनी तलाठ्यांकडे अहवालाची मागणी केली. परंतु तलाठ्यांकडून अहवाल निरंक येत असल्याने या जमिनीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागले आहे. या जमिनीवर अतिक्रमण वाढत असताना तलाठ्यांकडून निरंक अहवाल येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. माळकिन्ही, काळी, टेंभी, नांदगव्हाण येथील नागरिकांनी महसूलच्या ई-क्लास जमिनीची मागणी केली आहे. साधारण २०० हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाल्याचे नागरिकांनी केलेल्या मागणीवरून लक्षात येते. अतिक्रमण केलेल्या जमिनी त्यांना नियमित करून हव्या आहेत. संबंधितांनी जमिनी आपल्या नावे करून देण्यासाठी तहसीलमध्ये अर्ज दाखल केले आहे, असे १९ प्रकरणे तहसील कार्यालयात सुरू आहे. दहा हजार एकर महसूल जमिनीचे हे प्रकरण चांगलेच खोलवर रुजले आहे. यात मोठी साखळी निर्माण झाली आहे. दलालांच्या माध्यमातून बहुतांश जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. मागणी केलेल्या तीन गावातील प्रकरणे तेवढी रेकॉर्डवर आल्या आहे. जे रेकॉर्डवर नाहीत, परंतु त्यांचे आजही व्यवहार सुरू आहे. असे असताना तलाठ्यांनी जमिनीवर अतिक्रमण झाले नसल्याचा अहवाल दिला. सध्या जमिनीचा एकरी दर १० ते १५ लाख आहे. गावठाणमधील प्लॉटची किंमत दोन ते तीन हजार रुपये प्रती चौरस फूट आहे. महसुली जमिनी रेकॉर्डला असल्या तरी त्या नेमक्या कुठे आणि कोणाच्या ताब्यात आहे, हे मात्र दिसत नाही. महागाव तालुक्यातील ई-क्लास जमिनीच्या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास मोठे गौडबंगाल बाहेर येण्याची शक्यता आहे. परंतु सध्या तरी कुणी याकडे लक्ष देत नाही. (शहर प्रतिनिधी)ई-क्लास जमीन शासनाच्या रेकॉर्डला आहे. त्या जमिनीची स्थिती काय आहे या विषयी अहवाल मागविला. केवळ नांदगव्हाण, काळी, टेंभी आणि माळकिन्ही येथील १९ अतिक्रमणाचे प्रकरण कार्यालयात सुरू आहे. जमिनीबाबत पुन्हा माहिती घेतली जाईल आणि गैरव्यवहार शोधले जातील. - चंद्रशेखर कुंभलकर तहसीलदार, महागाव