शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

करंजी हायवे पोलिसांची दबंगगिरी

By admin | Updated: June 17, 2017 01:22 IST

करंजी येथील हायवे पोलिसांच्या दबंगगिरीमुळे वाहनचालक कमाल’चे त्रस्त झाले आहे. महामार्गावरील

 वाहनचालक त्रस्त : वाहनधारकांकडून बळजबरीने अवैध वसुली लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : करंजी येथील हायवे पोलिसांच्या दबंगगिरीमुळे वाहनचालक कमाल’चे त्रस्त झाले आहे. महामार्गावरील अपघातग्रस्ताना वेळीच मदत करण्याच्या हेतूने येथे महामार्ग पोलीस केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मुळ हेतूला हरताळ फासत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी बळजबरीने अवैध वसुली करण्यातच मग्न असल्याचे दिसून येत आहे. अवैध वसुलीसाठी देवधरी घाट व कोठोडा हे दोन फिक्स पॉर्इंट तयार करण्यात आले असून याठिकाणी खुलेआम तसेच रात्री-बेरात्री ट्रकचालकांना धमकवून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पदावर कार्यरत पोलीस अधिकारी मद्यप्राशन करून वाहनचालकांशी अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच धमकावून बळजबरीने व कारवाईचा धाक दाखवून अवैध वसुली करीत असल्याचेही सांगितले जाते. तसेच त्याचा येथील इतर कर्मचाऱ्यांवर विश्वास नसल्याने करंजी येथील मधू नामक एका गुंड प्रवृत्तीच्या इसमाची नेमणूक करण्यात आली आहे. मधू नामक इसम अवैध वसुलीच्या गोरख धंद्यावर लक्ष ठेवतो. येथील एपीआयच्या अशा अवैध वसुलीमुळे ट्रकचालकांमध्ये कमालिची दहशत पसरली असूनस अनेकवेळा वसुलीसाठी वाहनांना तासनतास रेंगाळत ठेवले जाते. याचा वाहतुकीवरही विपरीत परिणाम होताना दिसतो. रस्त्याच्या कडेला वाहनांची लांबच लांब रांग लागलेली येथून प्रवास करताना अनेकवेळा दिसून पडते. अनेकदा तक्रारी करूनही वरिष्ठांचे दुर्लक्ष अनेकवेळा तक्रारी करूनही हा प्रकार सुरूच असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. येथे कार्यरत एपीआय थेट मुख्यमंत्र्यांशी आपले संबंध असल्याची बतावणी करतो.तसेच कोणताच लोकप्रतिनिधी माझे वाकडे करू शकत नाही. तक्रार असल्यास कोणालाही मुख्यमंत्र्यांसमोर हजर करू शकतो, अशी भाषा वापरत असल्याचे वाहनधारक सांगतात. वाहनचालकांनादेखिल अशाच धमक्या देऊन ओव्हरलोडींग किंवा कागदपत्र तपासणीच्या नावाखाली रक्कम उकळली जाते. करंजी महामार्ग पोलीस केंद्रात सुरू असलेल्या या अवैध वसुलीच्या गोरखधंद्यावर त्वरित अंकुश लावण्याची लावण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.