शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

सिलिंडरचा स्फोट, तीन घरे जळून खाक, यवतमाळात बुधवारी दुपारची घटना

By सुरेंद्र राऊत | Updated: March 29, 2023 18:37 IST

गोधनी मार्गावरील नवजीवन सोसायटीत घडला प्रकार

सुरेंद्र राऊत, यवतमाळ: शहरातील अमोलकचंद महाविद्यालयाच्या बाजूला गोधनी मार्गावर झोपड्यांमध्ये अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पत्र्याची तीन घरे जळून राख झाली. यातच ऑटोरिक्षाचाही कोळसा झाला. अचानक काय झाले याचा अंदाज येण्याअगोदरच आगीने या घरांची राख केली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते.

रवी मोतीराम राठोड, अमोल देवतळे, श्यामराव कांबळे या तिघांनी गोधनी रस्त्याच्या बाजूला नाल्यालगत असलेल्या जागेत स्वत:चा निवारा उभा केला होता. टीन पत्र्याच्या घरात राहून रोजमजुरी करुन हे तीनही कुटुंब उदरनिर्वाह करीत होते. रवि राठोड यांची फिरती रसवंती आहे. तर इतर दोघे रोजमजुरीची कामे करतात. संपूर्ण कुटुंबच घराला कुलूप लावून कामावर जाते. तीनही घरे बंद असताना अचानक गॅस गळती होवून सिलिंडर स्फोट झाला. नेमकी आग कशाने लागली हे स्पष्ट नसले तरी सिलिंडर स्फोट व गॅस गळती हा प्राथमिक अंदाज लावला जात आहे.

आगीचा डोंब अचानक उसळल्यानंतर एकच धावाधाव झाली. अग्नीशमन बंबाला बोलाविण्यात आले. तोपर्यंत मात्र सिलिंडरचा स्फोट होवून घराचे पत्रे वरुन गेलेल्या उच्च दाब वाहिनी वीज तारांवर जावून अडकले. यामुळे स्पार्किंग होवून वीज पुरवठाही बंद पडला.

सुदैवाने तीनही घरात एकही व्यक्ती नव्हता. त्यामुळे जिवीत हानी टळली. मात्र घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घरासमोर उभा असलेला ऑटोरिक्षाचीही राख झाली. परिसरातील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र टळटळीत उन्ह व एकाच वेळी उठलेली आग डोंब यामुळे कुणालाही काहीच करता आले नाही. अग्नीशमन बंब पोहोचल्यानंतर आगेत तपून लाल झालेले टीनपत्रे पाण्याने थंड करण्याचा प्रयत्न होता. आग इतरत्र पसरु नये म्हणून धूमसत असलेली राख व निखारे विझविण्यात आले. या आगीत तीन कुटुंब उघड्यावर आले आहे. आता त्यांच्याकडे साधा चम्मचही शिल्लक नाही. सायंकाळच्या भोजनाचा प्रश्न या कुटुंबापुढे उभा ठाकला आहे. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषद मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांनी घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. आगग्रस्तांची सांत्वना केली.

बघ्यांची जमली गर्दी- दुपारची वेळ असली तरी आग लागल्यानंतर मोठी गर्दी येथे जमली होती. सुरुवातीला काहींनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅस सिलिंडरचे स्फोट होवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. धाडसाने पुढे येवून आग विझविण्याची धडपड करण्यात आली. त्यात यश आले नाही. घरे जळून खाक झाली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ