शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सांस्कृतिक कार्यक्रमांची होती वर्षभर रेलचेल

By admin | Updated: December 30, 2015 03:00 IST

सांस्कृतिक चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल होती.

संगीताच्याही मैफल : समतापर्व आणि स्मृतिपर्वातून वैचारिक मेजवाणी यवतमाळ : सांस्कृतिक चळवळीत सदैव अग्रेसर असणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रमांची रेलचेल होती. राज्य नाट्यस्पर्धेसाठी सात नाटकांची निवड यवतमाळच्या नाट्य चळवळीला बळ देणारी ठरली. तर समतापर्व आणि स्मृतीपर्वातून यवतमाळकरांना सरत्या वर्षाने वैचारिक मेजवाणी दिली. सुप्रसिद्ध गायक भीमराव पांचाळे यांच्या ‘शब्द सुरांच्या भाव यात्रे’ने सरत्या वर्षाची सुरूवात झाली होती. विदर्भ युवा विकास मंचच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाने श्रोत्यांवर स्वरांची जादुई बरसात केली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी स्मृती देशभक्तीपर समुहगीत गायन स्पर्धा येथील ‘प्रेरणास्थळा’वर आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीचे स्फुलिंग चेतविले. सरत्या वर्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यवतमाळकरांना शिवकाळात घेऊन जाणारे शिवकालिन शस्त्र प्रदर्शन होय. यवतमाळच्या गुरूदेव मंगल कार्यालयात गिरीश जाधव यांच्या संग्रहातील शस्त्रात्रांचे प्रदर्शन मेजवानी ठरले.सांस्कृतिक आणि वैचारिक चळवळीला बळ देणाऱ्या समता पर्वाची यवतमाळकर वर्षभर वाट पहात असतात. सरत्या वर्षात एप्रिल महिन्यात महात्मा जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त समता पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. सफाई कामगार आंदोलनाचे नेते बेजवाडा विल्सन यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले. समता पर्वातील यवतमाळ आयडॉलने नवोदित गायकांचा शोध घेतला. चित्रपटसृष्टीशी सरत्या वर्षाने नाते जोडले. शेतकरी आत्महत्यांवर आधारित आत्मदाह हा चित्रपट प्रदर्शित झाला. कलावंत आणि छायाचित्रणही यवतमाळ जिल्ह्यातच झाले. या चित्रपटाने शेतकरी आत्महत्यांवर प्रकाश टाकून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिपर्वाचे आयोजन यवतमाळकरांना वैचारिक मेजवानी देणारे ठरले. विविध विषयांवर या स्मृतीपर्वात मंथन झाले. यवतमाळ ही हौशी कलावंतांची नगरी आहे. या नगरीने अनेक नाट्यकलावंत दिले आहेत. अशाच या यवतमाळ नगरीतील एक-दोन नव्हे तर तब्बल सात नाटके राज्य स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात ‘व्वा! वाटेल ते प्रेमासाठी’, ‘अभिनेत्री’, ‘तप्त दहाही दिशा’, ‘खेळ’, ‘आसूरबा’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘हीच तर प्रेमाची गंमत आहे’ ही नाटके चंद्रपूरच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेत सहभागी झाली होती. (नगर प्रतिनिधी)