शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणी जन्मोत्सवात सांस्कृतिक मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:50 IST

येथील चिंतामणी जन्मोत्सवातून धार्मिकच नाही तर, समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कलेचेही सादरीकरण करण्यात आले. एकंदरीत चिंतामणीचा जन्मोत्सव भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक मेजवाणीच ठरला.

ठळक मुद्देमनोरंजनातून प्रबोधन : धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, विद्यार्थी, नागरिकांचा मोठा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : येथील चिंतामणी जन्मोत्सवातून धार्मिकच नाही तर, समाजप्रबोधनाचाही संदेश देण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कलेचेही सादरीकरण करण्यात आले. एकंदरीत चिंतामणीचा जन्मोत्सव भाविकांसाठी धार्मिक, सांस्कृतिक व प्रबोधनात्मक मेजवाणीच ठरला.प्रवचन, कीर्तन, द्वारयात्रा मिरवणूक, दीपयज्ञ, महाप्रसाद, गणेश यज्ञ, साग्रसंगीत, महाअभिषेक, हरिपाठ, दहीहांडीसह विविध धार्मिक कार्यक्रम उत्सवात पार पडले. सत्यसाई सेवा समितीद्वारे अतिशय सुंदर साईभजन सादर करून भाविकांची मने जिंकली. ‘हास्यकवी संमेलनातून’ आईची महिमा, शेतकऱ्यांची स्थिती, शासन, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, सरकार, देशापुढील विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला. अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. कवी किरण जोशी, कपिल बोरुंदिया, डॉ.संतोष मुजुमदार व नम्रता नमिता यशस्वी ठरले.सुधीर महाजन व संचाने ग.दी. मांडगुळकर यांचे ‘गीत रामायण’ सादर केले. पूर्वी रेडीओवर ऐकलेल्या गीत रामायणाची यानिमित्ताने प्रत्यक्ष आठवण झाली. प्रवीण तिखे यांचा ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ हा तुफान विनोदी कार्यक्रम हास्याचे कारंजे उडविणारा ठरला. हलक्या फुलक्या विनोदातून सामाजिक संदेशही देण्यात ते विसरले नाही. शिल्पा निशीकांत थेटे यांच्या मार्गदर्शनात ‘नुपुर’ या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याविष्काराने सर्वांची मने जिंकली. हास्य कलावंत अरविंद भोंडे यांचा ‘कार्यक्रम असा की पोटभर हसा’ हा कार्यक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून चेहºयावर हास्य फुलविणारे हे सर्वच कार्यक्रम प्रेक्षक व भाविकांच्या दीर्घकाळ लक्षात राहील असेच होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखर चांदोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत गोसटवार, सचिव श्याम केवटे, सहसचिव राजेश भोयर आदींनी पुढाकार घेतला.