शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

क्रूझर चोरटे अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 00:44 IST

वसंतनगर परिसरातून एक महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या क्रूझरचा पोलिसांनी शोध घेतला असून आदिलाबाद येथून पाच चोरट्यांना जेरबंद केले.

ठळक मुद्देपाच आरोपी : आदिलाबादमध्ये कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : वसंतनगर परिसरातून एक महिन्यापूर्वी चोरीस गेलेल्या क्रूझरचा पोलिसांनी शोध घेतला असून आदिलाबाद येथून पाच चोरट्यांना जेरबंद केले.सैयद असलम सैयद सलिम (२४) रा.काळी दौ., सलाम शाह समशेर शाह (२२) रा.दुधे ले-आऊट पुसद, शोएब खान अख्तर खान (२१) व शोएब खान फरीद खान (२१) दोघेही रा.वसंतनगर आणि आवेश अहेमद सलीम अहेमद (२२) रा.पार्वतीनगर पुसद अशी आरोपींची नावे आहे. महिनाभरापूर्वी वसंतनगरमधून अमोद्दीन फकरोद्दीन रा.काळी दौ. यांच्या मालकीची क्रूझर (क्र.एम.एच.२९/ए.डी.५५६९) चोरीस गेली होती. तिची किमत साडेसात लाख रुपये होती. अमोद्दीन फकरूद्दीन येथील वसंतनगरमधील सासूरवाडीत आले होते. त्यांनी रात्री आपले वाहन सासºयांच्या घरासमोर उभे ठेवले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही क्रूझर चोरून नेली.या प्रकरणी ७ आॅक्टोबरला वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, ठाणेदार प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलीस उपनिरीक्षक राजू खांडवे, पोलीस कर्मचारी गोपाल वास्टर, मुन्ना आडे, राहुल माहुरे, नागेश वास्टर, मोहसीन खान आदींनी या गुन्ह्याचा छडा लावला.मुख्य आरोपी सैयद असलम सैयद सलीम (२४) याच्या मोबाईल लोकेशनवरून वसंतनगर पोलिसांनी त्याला किनवट जि.नांदेड येथून ताब्यात घेतले. नंतर त्याने दिलेल्या कबुलीवरून चार आरोपींना तेलंगणातील आदिलाबाद येथून अटक केली. हे चौघेही आदिलाबाद येथे वाहन विकण्यासाठी गेले होते.