शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा निर्घृण खून

By admin | Updated: February 6, 2017 00:09 IST

सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्याची घटना येथील वडगाव रोडच्या वडारवाडी परिसरात

दोघांना अटक : वडगाव रोड येथील घटना यवतमाळ : सेवानिवृत्त जमादाराच्या मुलाचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्याची घटना येथील वडगाव रोडच्या वडारवाडी परिसरात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या १२ तासात दोनही आरोपींना अटक केली आहे. दारूच्या वादात चाकू हल्ला केल्याचे आरोपींनी सांगितले. स्वप्नील धनंजय ढाकरगे (२५) रा. नेताजीनगर असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी गौरव सुभाष मानेकर (२५) रा. आर्णी रोड आणि आशिष प्रभाकर गजभिये (३२) रा. राऊतनगर यांना पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव रोडच्या वडारवाडी परिसरात शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास स्वप्नीलवर या दोघांनी चाकूने हल्ला केला आणि आरोपी आॅटोरिक्षाने पसार झाले. स्वप्नील रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. तो मदतीसाठी बराच वेळ धडपडत होता. मात्र कुणीही मदत केली नाही. अखेर त्याची मामे बहीण संगीता रवींद्र वानखडे घटनास्थळी आली. तिला स्वप्नीलने गौरव व आशिषने चाकू हल्ला केल्याचे सांगितले. त्यानंतर संगीताने स्वप्नीलला आॅटोरिक्षातून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र अतिरक्तस्त्रावाने स्वप्नीलचा मृत्यू झाला. या घटनेने वडारवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांना या घटनेची माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी संगीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. वडगाव रोडचे प्रभारी ठाणेदार सारंग मिराशी यांनी रात्रीच आरोपींचा शोध सुरू केला. रविवारी दुपारी आरोपी आशिष गजभिये व गौरव मानेकर या दोघांना अटक करण्यात आली. त्यांची कसून चौकशी सुरू असून दारुच्या वादातून हा हल्ला झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. या कारवाईत वडगाव रोड ठाण्यातील कर्मचारी नीलेश राठोड, सुरेश मेश्राम, प्रमोद मडावी, बबलू चव्हाण, प्रशांत गेडाम, रावसाहेब शेंडे, आशिष चौबे सहभागी झाले होते. पोलिसांनी दोघांची कसून चौकशी चालविली असून अटकेतील आरोपींची पोलीस कोठडी घेतली जाणार आहे. त्यातून या खुनाचे खरे कारण पुढे येणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)