शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

कोहळाच्या लाचखोर सरपंचाला अटक

By admin | Updated: November 19, 2014 22:48 IST

सिंचन विहिरीच्या मंजूर निधीचा धनादेश खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील कोहळा येथील सरपंचाला बुधवारी अटक करण्यात आली.

नेर : सिंचन विहिरीच्या मंजूर निधीचा धनादेश खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील कोहळा येथील सरपंचाला बुधवारी अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली. नंदकुमार चंद्रभान तलवारे असे लाच मागणाऱ्या सरपंचाचे नाव आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कोहळा येथील सुरेश राठोड यांंना विहीर मंजूर झाली. त्यासाठी त्यांना एक लाख ९० हजार रुपये मिळणार होते. त्यापैकी ५०-५० हजार प्रमाणे एक लाख रुपये मिळालेही होते. त्यानंतर दिवाळीपूर्वी ६५ हजार रुपयांचा धनादेश आल्याची माहिती सचिवाने दिली होती. त्यामुळे राठोड सरपंच नंदकुमार तलवारे यांंना भेटला. त्यावेळी सरपंचाने यापूर्वी एक लाख रुपये मिळाले आहे आता उर्वरित पैसे काढण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. वारंवार विनंती करूनही उपयोग होत नव्हता. शेवटी राठोड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून अधिकाऱ्यांनी पंचासमोर लाचेची चाचपणी केली. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. मात्र तहसील कार्यालयाजवळ पैसे घेण्यासाठी येण्याचे सांगूनही तो आला नाही. नंतर राठोड याला पैसे घेऊन घरी बोलाविले. मात्र तेथेही सरपंच पोहोचला नाही. त्यामुळे हा ट्रॅप फसला. परंतु फोनवरील रेकॉर्डिंग आणि पंचाच्या बयाणावरून बुधवारी सरपंच नंदकुमार तलवारे याला त्याच्या घरून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध नेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, कर्मचारी अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, अमोल महल्ले, नीलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)