शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शिफारशींसाठी सदस्यांकडे गर्दी

By admin | Updated: July 15, 2015 03:04 IST

अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप केल्या जाणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे शेतकऱ्यांच्या येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत.

अनुदानावर कृषी साहित्य : जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांकडे लाभार्थ्यांच्या रांगाराळेगाव : अनुदानावर शेतकऱ्यांना कृषी साहित्याचे वाटप केल्या जाणार आहे. त्याकरिता जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांकडे शेतकऱ्यांच्या येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. पंचायत समितीत दररोज गर्दी वाढलेली दिसत आहे. जिल्हा परिषदव्दारे ७० टक्के, पंचायत समिती ९० टक्के, समाज कल्याण विभाग १०० टक्के अनुदानावर विविध कृषी साहित्य शेतकऱ्यांना वाटप करणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसचे सदस्य पदाधिकारी असल्याने त्यांच्या शिफारशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकरिताच होईल हे स्पष्ट आहे. तरी भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्तेही त्यांनाही अनुदानाचे हे साहित्य मिळावेच म्हणून प्रयत्नशील आहे. त्यांना यातून टाळण्यात आल्यास त्यांनीही कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. जिल्हा परिषदेव्दारे पीव्हीसी पाईप, स्पायरल सेपरेटर, पेरणी यंत्रण, ताडपत्री, पंचायत समितीकडून टीनपत्री, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन, पीव्हीसी पाईप, समाज कल्याण विभागाकडून पीव्हीसी पाईप, ताडपत्री वाटप केल्या जाणार आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना या योजनांची माहिती नाही. त्यातच पेरणीचा मोसम निघून गेल्याने पेरणी यंत्राची उपयुक्तता यावर्षी तरी संपली आहे. जिल्हा परिषदेचे तालुक्यात काँग्रेसचे एक, राष्ट्रवादीचे एक, राष्ट्रवादी समर्थित एक असे तीन जिल्हा परिषद सदस्य आहेत. तर पंचायत समितीत काँग्रेसचे चार, राष्ट्रवादी एक, भाजप एक याप्रमाणे सहा सदस्य आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष गत वर्षी काँग्रेसमध्ये सामील झाल्याने बहुतांश सदस्य काँग्रेसचेच झालेले आहेत. तांत्रिक बाबीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मानले जातात. राळेगाव नगरपंचायत झाल्याने हा भाग ग्रामीणमधून नागरीमध्ये वर्ग झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मोजक्या गावातील मर्यादित लोकसंख्येतूनच आपल्या लोकांना व मागेल त्याला लाभ मिळून देण्याची संधी यावेळी मिळाली आहे. पेरणीचा हंगाम सुरू होऊन महिना लोटला आहे. अशावेळी पंचायत समितीपर्यंत आलेले अनुदानावरील कृषी साहित्य तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. मात्र ऐनवेळी लोकप्रतिनिधींच्या शिफारसीची अट घालून गरजू लाभार्थ्यांची कोंडी करण्यात आली आहे. तर राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते यात हात ओले करण्याच्या मनस्थितीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)