शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक कंत्राटी पदांसाठी सुशिक्षित बेरोजगारांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

जिल्हा बॅंकेत लिपिकाच्या १६५, तर शिपायाच्या ३० कंत्राटी पदासाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली होती. त्यात १५ मार्चपर्यंत अर्ज मागण्यात आले  आहे. शुक्रवारी हे अर्ज दाखल करण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. विशेष असे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले युवक या कंत्राटी पदासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आठ हजार ते १५ हजार मानधन दिले जाते.

ठळक मुद्देलिपिक १६५ : शिपायाच्या ३० जागा, १५ मार्च अंतिम तारीख

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात उद्याेग, व्यवसाय नसल्याने बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात आहे, याचा प्रत्यय शुक्रवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आला. कंत्राटी पदाचे अर्ज भरण्यासाठी जिल्हाभरातील सुशिक्षित बेराेजगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावरून जिल्ह्यातील बेरोजगारीच्या स्थितीचा अंदाज येतो.  जिल्हा बॅंकेत लिपिकाच्या १६५, तर शिपायाच्या ३० कंत्राटी पदासाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली होती. त्यात १५ मार्चपर्यंत अर्ज मागण्यात आले  आहे. शुक्रवारी हे अर्ज दाखल करण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. विशेष असे, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले युवक या कंत्राटी पदासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळाले. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आठ हजार ते १५ हजार मानधन दिले जाते. ११ महिन्यांसाठी त्यांचे कंत्राट असते. गेल्या कित्येक वर्ष जाहिरात न काढता, त्यांच्या कंत्राटाचे परफॉर्मन्स पाहून नूतनीकरण केले जात होते. परंतु, यावेळी संचालक मंडळ बदलताच या कंत्राटी पदासाठी नव्याने जाहिरात काढण्यात आली. या कंत्राटी पदाआडही आतापर्यंत ‘अर्थ’कारण चालत होते. हा पायंडा खंडित होतो की नव्या संचालक मंडळात पुढेही चालतो, याकडे नजरा लागल्या आहेत. जिल्हा बॅंकेने स्थायी पदासाठी घेतलेली भरती कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे. १४७ जागांसाठी अमरावतीच्या खासगी एजंसीकडून भरतिप्रक्रिया राबविली गेली. मात्र, न्यायालयाने त्यातील ४२ जागा मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवत नव्याने प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, या ४२ जागांसाठी एजंसीचा शोध घेतला जात आहे. ‘आयबीपीएस’ या राष्ट्रीयीकृत बॅंकांची नोकरभरती घेणाऱ्या कंपनीने बँकेने स्वत:हून प्रस्ताव दिल्यास भरती प्रक्रिया पूर्ण करून देण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय पुण्यातील कंपन्याही इच्छुक आहे. मात्र, बॅंकेचा इन्टरेस्ट ‘नायबर’साठी असल्याचे सांगितले जाते. एजंसी ठरविण्यासाठी १० मार्चला बैठक आयोजित होती. मात्र, त्याच दिवशी कर्जवसुलीवरही बैठक असल्याने ही बैठक आता १५ मार्चला घेतली जाणार आहे.  

टॅग्स :bankबँकUnemploymentबेरोजगारी