शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महिला पतसंस्थेत कोट्यवधी रुपये बुडाले

By admin | Updated: December 3, 2014 22:58 IST

महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगावमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पुढे येवून ठेवीदारांच्या समर्थनार्थ अभिकर्त्यांसह वेळोवेळी विविध आंदोलने केली.

राळेगाव : महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगावमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पुढे येवून ठेवीदारांच्या समर्थनार्थ अभिकर्त्यांसह वेळोवेळी विविध आंदोलने केली. विजयराज शेगेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मे महिन्यापासून हे सतत सुरू असून संस्थेच्या अध्यक्ष लता वनकर, संचालिका, व्यवस्थापक आदींवर १८ आॅगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आतापर्यंत संबंधित एकाही दोषीला अटक झालेली नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये असंतोष पसरला आहे. सहकार विभागाने या संस्थेचे विशेष वैधानिक लेखा परीक्षण यवतमाळ येथील प्रमाणित लेखा परीक्षक एम.जी. वानखेडे यांच्याकडून करवून घेतले. त्यांनी आपला अहवाल १५ सप्टेंबर रोजी येथील सहायक निबंधकांकडे सादर केला. या अहवालावरून शासन त्वरित जागे होईल आणि त्वरित शासनातर्फे आॅडिट रिपोर्टसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतील आणि त्यावरून तरी पोलीस दोषींना अटक करतील, अशी अपेक्षा होती. मात्र या बाबतीतही सर्वत्र सावळा गोंधळ आणि मंदगती सुरू आहे. आॅडिट रिपोर्टवर सरकारी वकीलांना सल्ला मागून रिपोर्टबाबत पुढील कारवाई करण्याचे निर्देश सहकार विभागाने आॅडिटरला दिले आहे. पण अद्यापही सल्ला, सूचना प्राप्त झाली नसल्याने पुढील कारवाई थांबली आहे. संचालक मंडळाने कर्ज वितरित करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही, आवश्यक ती कागदपत्र आणि तारणाशिवाय कर्ज वितरण करण्यात आले, कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले नाही वा कोणत्याही सभासदावर ठोस कारवाई करण्यात आली नाही, ६० ते ७० टक्के एवढीच रक्कम कर्ज रूपाने वाटप करावयाची असताना ८६ टक्के कर्जवाटप करण्यात आले. संस्थेच्या सचिव, पाच संचालिका एक लाख ३७ हजार ७५० रुपयांच्या थकबाकीदार आहे, त्यांना संस्थेच्या समितीचे सदस्य राहता येत नाही आदी बाबी आॅडिटमध्ये नमूद करण्यात आल्या आहे. यानंतरही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)