शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

उमरखेड उपविभागाला कोट्यवधींचा फटका

By admin | Updated: March 9, 2016 00:11 IST

उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.

गारपिटीचा तडाखा : शेतकऱ्यांच्या व्यथा थेट दिल्लीतउमरखेड : उमरखेड उपविभागात गत आठवड्यात झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने शेकडो हेक्टरवरील कोट्यवधी रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेक गावात कृषी व महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. तर या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा खासदार राजीव सातव यांनी थेट दिल्लीत मांडल्या आहे.गत आठवड्यात महागाव आणि उमरखेड या तालुक्यात प्रचंड गारपीट झाली. अनेक गावात शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान झाले. त्यात उमरखेड तालुक्यातील साखरा, दिघडी, देवसरी, चालगणी, टाकळी, राजापूर, तिवडी, बाळदी, सुकळी तसेच महागाव तालुक्यातील लेवा, हिवरा, करंजखेड, महागाव, सवना, अंबोडा, गुंज, अनंतवाडी, धनोडा, ईजनी, पोहंडूळ, धार, आमणी या गावात प्रचंड नुकसान झाले. आता आठवडा झाला तरी बहुतांश गावात कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी सर्वेक्षणासाठी पोहोचले नाही. लाखो रुपयांचे नुकसान झाल्यानंतरही प्रशासन दखल घ्यायला तयार नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. लेवाच्या सरपंच माहेश्वरी खंदारे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी केली आहे.शेतीच्या नुकसानीसोबतच उमरखेड उपविभागातील घरे, जनावरे, धान्य, टीनपत्रे आदींचेही मोठे नुकसान झाले आहे. या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांच्या या भावना हिंगोलीचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी संसदेच्या अधिवेशनात शून्य प्रहरात उपस्थित केला. त्यांनी शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. आता शेतकऱ्यांचे शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)