शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा अडला फाईलीत

By admin | Updated: August 8, 2014 00:12 IST

केंद्र आणि राज्य शासनाने पीक विम्यातील अनुदानाची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात अद्यपही वळती केली नाही. परिणामी पीक विम्याची मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे.

शेतकरी प्रतीक्षेत : केंद्र आणि राज्य शासनाने अनुदान दिलेच नाहीरूपेश उत्तरवार - यवतमाळ केंद्र आणि राज्य शासनाने पीक विम्यातील अनुदानाची रक्कम विमा कंपनीच्या खात्यात अद्यपही वळती केली नाही. परिणामी पीक विम्याची मदत जाहीर होऊनही शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. अनुदानाची फाईल राज्य शासनाच्या अर्थ विभागात अडकल्याने जिल्ह्यातील ८९ हजार शेतकरी प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यातील ८९ हजार शेतकऱ्यांना ३४ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. महिनाभरापूर्वी घोषणा झाली. शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली. शेतकरी दररोज जिल्हा आणि राष्ट्रीकृत बँकेत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्यांना रित्या हाताने परतावे लागत आहे. राज्यात ८४ कोटी रूपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला ३४ कोटी ६८ लाख रूपयांची मदत आली आहे. दुबार आणि तिबार पेरणीच्या काळात बियाणे खरेदीसह खतासाठी पीक विम्याची रक्कम मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. राष्ट्रीय पीक विमा योजनेत पाच एकरा आतील शेतकऱ्यांना हेक्टरी विमा उतरवितांना ७० टक्के भार राज्य आणि केंद्र शासन उचलते. तर ३० टक्के विम्याची रक्कम शेतकऱ्यांना भरायची असते. पाच एकरावरील शेतकऱ्यांना ५० टक्के विमा रक्कम भरायची आहे. तर ५० टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासन भरणार होते. यातील शेतकऱ्यांनी आपला वाटा विमा उतरवितांना भरला. मात्र राज्य आणि केंद्र शासनाचा वाटा विमा कंपनीकडे वळताच झाला नाही. अनुदानाची ही रक्कम मिळावी म्हणून विमा कंपनीने अर्थ विभागाकडे फाईल सादर केले. मात्र या लेखा शिर्षावर अनुदानाचा पैसाच नाही. त्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही छदाम जमा केला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहे.