शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पीक आणेवारी फेरमूल्यांकन

By admin | Updated: November 20, 2015 02:42 IST

जिल्ह्यातील पीक आणेवारी जाहीर करण्यात आली. यात केवळ आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती दाखविण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत ठराव : आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी धोरण ठरविणार यवतमाळ : जिल्ह्यातील पीक आणेवारी जाहीर करण्यात आली. यात केवळ आठ तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती दाखविण्यात आली आहे. उर्वरित आठ तालुक्यात मात्र आणेवारी ५० पैशाच्यावर दाखविली आहे. या पीक आणेवारीचे फेरमूल्यांकन केले जावे, असा ठराव जिल्हा परिषद स्थायी समितीने गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत घेतला. शिवाय जिल्हा परिषदेच्या विविध योजना एकत्रित (कन्व्हर्जन) करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत देता येईल का याचे धोरण ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांची समितीही स्थापन करण्यात आली. पीक आणेवारीत नेर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, बाभूळगाव, यवतमाळ, कळंब या तालुक्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी दाखविण्यात आली. तर वणी, झरी, मारेगाव, राळेगाव, पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, पुसद येथील पीक स्थिती उत्तम असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात ३० आॅक्टोबरला जिल्हा स्तरीय तपासणी समितीने घाटंजी तालुक्यातील पार्डी, कुऱ्हाड, पांढुर्णा, ससानी, आमडी या गावांमध्ये पीक पाहणी करून ८० ते ९० टक्के पीक बुडाल्याचा अहवाल दिला. या समितीमध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अशा पाच तज्ज्ञांचा समावेश असतो. त्यांनी ८० ते ९० टक्के पीक बुडाल्याचा अहवाल ३ नोव्हेंबरला दिला. मात्र याच तालुक्यातील पीक आणेवारी ५० पैशापेक्षा जास्त दाखविण्यात आली. त्यामुळे आणेवारी राजकीय दबावातून जाहीर झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये केला. शासनाच्या दोन यंत्रणा इतक्या भिन्न पद्धतीने अहवाल देतात हे अतिशय चुकीचे असल्याचे सांगण्यात आले. समितीने आणेवारीच्या फेरमूल्यांकनाचा ठराव घेऊन तो शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला. यानंतर देवानंद पवार यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. यावरून शेतकऱ्यांंना जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या विविध योजना आणि सेस फंडातील निधीतून काही मदत करता येते का याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एक समिती गठित करण्यात आली. यात मुख्य लेखा अधिकारी, शिक्षणाधिकारी, समाज कल्याण अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी, कृषी विकास अधिकारी यांंचा समावेश आहे. यानंतर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसंदर्भातही चर्चा झाली. जिल्हा परिषदेच्या दुकानांचे भाडे वाढविण्यासाठी वकिलाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्यानंतर अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम १ यांच्या समितीकडे जबाबदारी सोपविली असून वसुली करणे, नव्याने भाडे करार केले जाणार आहे. स्थायी समितीमध्ये पदभरती प्रक्रियेत वेबसाईडवर अर्ज अपलोड होत नसल्याचा मुद्दाही चांगलाच गाजला. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, समितीचे सर्व सदस्य आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)