शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

महसूल नेत्यांवर अपहाराचे गुन्हे

By admin | Updated: June 11, 2015 02:18 IST

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांविरोधात आर्थिक अपहार व शासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांविरोधात आर्थिक अपहार व शासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून या नेत्यांच्या अटकेसाठी पथक रवाना केले. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. महसूल कर्मचारी संघटनेचे नेते संघटना प्रमुख रवींद्र देशमुख, अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे, कोषाध्यक्ष अशोक कट्यारमल यांच्यावर अपहार, खासगी व्यक्ती व शासनाची फसवणूक करणे, न्यास भंग कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय भवनात असलेले उपहारगृह विनोद राठोड या खासगी व्यक्तीला चालविण्यास दिले. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर राठोड याच्या बयानानुसार महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नौकरनामा केल्याचे सांगितले व करारापोटी ३० हजार रुपये अनामत व चार हजार रुपये प्रतिमहा भाडे संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक कट्यारमल यांना दिल्याचे सांगितले. याशिवाय पुनर्वसन शाखेच्या जिन्याखाली असलेल्या झेरॉक्स सेंटर धारकाकडून महसूल कर्मचारी संघटनेने भाडे वसूल केल्याची बाब पुढे आली. त्याच्याकडून २००५-०६ पासून १५०० रुपये प्रतिमाह इतके भाडे घेतले जात होते. या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांच्या ४ जूनच्या आदेशावरून यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलिसांनी चारही आरोपी तसेच या पूर्वी असलेले पदाधिकारी यांचा शोध घेणे सुरू केले आहे. नेत्यांवर फौजदारी कारवाई झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी )