शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा करा, जामिनासाठी अर्ज करा अन्‌ बिनधास्त व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चंदन हागडे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. आराेपी इतक्यावरच थांबवले नाही तर त्यांनी नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे एकच खळबड उडाली हाेती. या प्रकरणात चंदन हातागाडे याच्या तक्रारीवरून शहर पाेलिसांनी १३ जणांविराेधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात सुरुवातील चाैघांना अटक करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :  सर्वसामान्य  नागरिका विराेधात कायद्याची अंमलबजावणी करताना त्याना नसलेल्या तरतुदींचाही वापर केला जाताे. याउलट आर्थिक गब्बर असलेल्या गुन्हेगारांसाठी कायदातून पाेलीस अनेक पळवाटा शाेधातात. त्यामुळेच यवतमाळात वाटेल ताे गुन्हा करा, न्यायालयात जामिनासाठी अर्ज करा आणि बिनधास्त व्हा, असा खेळ सुरू आहे. अपहरण कांडातील रेतीमाफियांना न्यायालयाने जामीन दिला नाही तरी ते पाच महिन्यांपासून माेकाट आहेत. १३ आराेपी पैकी केवळ चार जणांना अटक झाली. रेतीमाफियांनी माहिती अधिकार कार्यकर्ता चंदन हागडे याचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. आराेपी इतक्यावरच थांबवले नाही तर त्यांनी नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल केले. यामुळे एकच खळबड उडाली हाेती. या प्रकरणात चंदन हातागाडे याच्या तक्रारीवरून शहर पाेलिसांनी १३ जणांविराेधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात सुरुवातील चाैघांना अटक करण्यात आली. त्यांची पाेलीस काेठडी घेतली गेली, नंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, तर चार आराेपींना अटकपूर्व जामीन मिळाला. उरलेले इतर पाच आराेपी मात्र जामीन मिळाला नसताना शहरात बिनधास्त फिरत आहेत. यातील एका म्हाेरक्याचा अटकपूर्व जामीन शुक्रवारी न्यायालयाने फेटाळला. त्यानंतरही पाेलिसांकडून काेणतीच कारवाई करण्यात आली. 

उपअधीक्षकांकडे तपास देवूनही गती संथ- या गंभीर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पाेलीस अधिकारी यवतमाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानंतरही यात ठाेस कारवाई झाली नाही. करण पराेपटे खुनातील आराेपींनाही केवळ पाेलिसांच्या चुकीमुळे जामीन मिळाला. ९० दिवसांत  दाेषाराेप पत्र सादर करण्यात आले नाही. आराेपी विराेधात माेक्काची कारवाई प्रस्तावित असताना न्यायालयाकडे दाेषाराेप पत्रासाठी रितसर मुदत मागणे अपेक्षित हाेते. ही प्रक्रिया सुद्धा नियमाप्रमाणे करण्यात आली नाही. परिणामी आराेपींना जामीन मंजूर झाला. यावरून पाेलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया