शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

गांजाचे आंतरपीक घेणाऱ्या पाच शेतकऱ्यांवर गुन्हा

By विशाल सोनटक्के | Updated: October 6, 2023 19:24 IST

महागाव तालुक्यात कारवाई : २५ लाख ३५ हजारांचा गांजा जप्त

यवतमाळ : महागाव तालुक्यातील घोणसरा व काळीदौलत शिवारात मागील दोन दिवसांपासून अवैध गांजा शेतीवर पोलिस कारवाई सुरू होती. अखेर या प्रकरणी पाच शेतकऱ्यांवर पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून या शेतकऱ्यांकडून सुमारे २५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कारवाईचे जिल्ह्यातील हे पहिलेच प्रकरण आहे. 

फालसिंग बाबूराव राठोड तसेच परिसरातील इतर काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गांजाची अवैध लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती.  या पथकातील पोलिसांनी प्रारंभी साध्या वेशात जाऊन माहितीची खातरजमा  केली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली ५० हून अधिक पोलिसांनी बुधवारी या शेतात धाड टाकली. येथे फालसिंग राठोड याच्या गोठ्यातून एका कापडी पिशवीमध्ये गांजा वनस्पतीची एक किलो २५ ग्रॅम बिजे आढळून आली. तसेच गोठ्यामागील शेत परिसरात कापूस व तूर पिकांची लागवड केलेल्या क्षेत्रात काही अंतरावर गांजा लावल्याचे आढळले.

या झाडांची मोजणी केली असता ६१० झाडे गांजाची आढळली. तसेच परिसरातील घोणसरा येथील देविदास श्यामराव ढाकरे, सुखदेव श्यामराव ढाकरे, वनदेव श्यामराव ढाकरे यांच्या शेतातही कापूस व तूर पिकामध्ये गांजाची एकूण ९६० झाडे आढळली. तर हिरासिंग राठोड यांच्या शेतात ९४० गांजा झाडे होती. वरील पाचही आरोपींकडून २५१० झाडांमधून २५ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ५०७ किलो (पाने व शेंडे) वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. तसेच सुमारे २१ हजार २५० रुपये किमतीचे १.२५ किलो ग्रॅम गांजा बिजही पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा तसेच पुसद पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ